Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष अभिनेत्री, साहित्यिका प्रिया तेंडुलकर

अभिनेत्री, साहित्यिका प्रिया तेंडुलकर

Subscribe

प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन. प्रिया तेंडुलकर या अभिनेत्री, साहित्यिका होत्या. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला.प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्यानंतर त्यांनी बँक कर्मचारी ते मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, सूत्रसंचालिका अशा विविध क्षेत्रांत त्यांनी यशस्वी करिअर केले.
‘तो एक राजहंस’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी ‘बेबी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘कन्यादान’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’, ‘फुलराणी’, ‘गिधाडे’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी ‘अडोस-पडोस’, ‘खानदान’, ‘जिंदगी’, ‘बॅ. विनोद’, ‘हम पाँच’, ‘दामिनी’ यांसारख्या मालिकांमधून उत्कृष्ट अभिनयाच्या आधारे आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.
नाटकं, टेलिव्हिजनवरील अभिनयाबरोबरच त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातदेखील उत्कृष्ट कार्य केले. मराठी चित्रपटांतही त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. त्यामुळेच ‘गोंधळात गोंधळ’, ‘माळावरचं फूल’, ‘मायबाप’, ‘देवता’, ‘माझं सौभाग्य’, ‘राणीने डाव जिंकला’, ‘माहेरची माणसं’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘हे गीत जीवनाचे’ हे त्यांचे चित्रपट आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहतात. अभिनय कलेबरोबरच प्रिया या उत्तम चित्रकार आणि लेखिकासुद्धा होत्या. वडील विजय तेंडूलकर यांच्या लेखन कलेचा वारसाही त्यांनी पुढे चालवला. ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’ या त्यांच्या कथासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे ‘जगले जशी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘जावे तिच्या वंशा’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. अशा या चतुरस्त्र अभिनेत्रीचे 19 सप्टेंबर 2002 रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -