Homeसंपादकीयदिन विशेषAnant Kanhere : क्रांतिकारक अनंत कान्हेरे

Anant Kanhere : क्रांतिकारक अनंत कान्हेरे

Subscribe

अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वात तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आयनी मेटे या गावात 7 जानेवारी 1892 मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर येथे तर माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले.

1908 मध्ये कान्हेरे छत्रपती संभाजी नगरला परतले. जेथे त्यांनी गुप्त क्रांतिकारी गटांच्या सदस्यांशी भेट घेतली. याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. 21 डिसेंबर 1909 या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असताना आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे आरक्षकांच्या स्वाधीन झाले. जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. 19 एप्रिल 1910 या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी 7 वाजता हे तीन क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -