घरसंपादकीयदिन विशेषखगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई

खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई

Subscribe

डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले.

डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्‍या त्यांनी पुढील शिक्षणासाठी १९३७ मध्ये ब्रिटन गाठले, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते.

त्यामुळे तिथून ते पुन्हा मायदेशी परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये संशोधनास सुरुवात केली. १९४७ मध्ये दुसरे महायुद्ध संपले आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. ब्रिटनमधून परतल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली.

- Advertisement -

केरळमधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आले होते. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना त्यांना सामोरे जावे लागले. या सगळ्यावर मात करत रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्राने पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचेच नाव दिले. आज हे केंद्र ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ म्हणून ओळखले जाते. ATIRAची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला.

अवकाश संशोधनासाठी भारत सरकारने १९६२ साली समिती नेमली. अर्थात, या समितीचे नेतृत्त्व डॉ. विक्रम साराभाई यांनीच केले. १९६९ मध्ये याच समितीच्या शिफारशीतून ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ची स्थापना करण्यात आली. इस्रोने पुढे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचं नाव अमेरिका, रशिया यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत नेऊन ठेवले. अशा या महान शास्त्रज्ञाचे ३० डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -