घरसंपादकीयदिन विशेषशास्त्रीय संगीतकार डॉ. जितेंद्र अभिषेकी

शास्त्रीय संगीतकार डॉ. जितेंद्र अभिषेकी

Subscribe

जितेंद्र अभिषेकी हे एक प्रतिभावान शास्त्रीय संगीतकार व गायक होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. वयाच्या १३ ते १४ व्या वर्षांपर्यंत त्यांना वडिलांकडून संगीताची तालीम मिळाली. दुर्गा, देस, काफी, खमाज असे संगीतातील राग ते वडिलांकडून शिकले.

जितेंद्र अभिषेकी हे एक प्रतिभावान शास्त्रीय संगीतकार व गायक होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. वयाच्या १३ ते १४ व्या वर्षांपर्यंत त्यांना वडिलांकडून संगीताची तालीम मिळाली. दुर्गा, देस, काफी, खमाज असे संगीतातील राग ते वडिलांकडून शिकले. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरू केले व प्रत्येक गुरूकडून नेमके तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.

संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे मर्म होते. त्यांनी मराठी रंगभूमीसाठी दिलेले योगदानही मोलाचे आहे. १९६४ मध्ये आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकातील पदांना त्यांनी संगीत दिले होते. त्यांनी तब्बल १७ नाटकांना संगीत दिले.

- Advertisement -

गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाचा मुख्य गाभा प्रयोगशीलतेवर आधारित होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील प्रयोग प्रेक्षकांना, संगीत रसिकांना खूप आवडले. १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या ‘तियात्र’ या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. अशा या प्रतिभावान संगीतकाराचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -