घरसंपादकीयदिन विशेषलोकनाट्य कलाकार शाहीर साबळे

लोकनाट्य कलाकार शाहीर साबळे

Subscribe

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे हे ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील माळकरी होते. वारकरी पंथाचे भजन-कीर्तन ते करीत असत. त्यांची आई निरक्षर पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती. त्यामुळे गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला.

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे हे ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील माळकरी होते. वारकरी पंथाचे भजन-कीर्तन ते करीत असत. त्यांची आई निरक्षर पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती. त्यामुळे गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. गावच्या भजनी मंडळात ते गात असत. बालवयात त्यांना बासरीवादनाचाही छंद जडला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे ते त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली, मात्र अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला.

गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे ‘जागृती शाहीर मंडळ’ त्यांनी काढले. पुढे १९४२ साली शाहीर शंकरराव निकम यांच्या प्रभावाखाली ते आले. निकमांकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रान उठवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला.

- Advertisement -

त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे ‘आधुनिक मानवाची कहाणी’ हा होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन यातही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्घ केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत शाहिरांनी गायले. ‘माकडाला चढली भांग’ (१९६९), ‘शेतात मोती, हातात माती’ (१९६९), ‘फुटपायरीचा सम्राट’ (१९७०), ‘एक तमाशा सुंदरसा’ (१९७१), ‘कोंडू हवालदार’ (१९७६) यांसारखी मुक्तनाट्ये सादर केली. त्यांची एकूण १४ मुक्तनाट्ये आहेत. अशा या तडाफदार शाहिराचे २० मार्च २०१५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -