Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय दिन विशेष दानशूर प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स

दानशूर प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स

Subscribe

शालेय जीवनात असतानाच ते कॉम्प्युटर बनविण्यात तरबेज झाले होते, वयाच्या जेमतेम २० व्या वर्षी आपला मित्र पॉल एलन समवेत १९७५ मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली.

विलिम हेनरी गेट्स उर्फ बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५५ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील सीयाटल येथे झाला. त्यांचे वडील विलियम एच गेट्स हे सुप्रसिद्ध वकील होते व त्यांची आई मेरी मॅक्सवेल या युनायटेड वे आणि फर्स्ट इंटरस्टेट बँक सिस्टमच्या बोर्ड्स ऑफ डायरेक्टरर्समधील एक होत्या. बिल गेट्स हे बालपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि विलक्षण प्रतिभेचे धनी होते.

सुरुवातीपासूनच त्यांना अभ्यासाची फार आवड असल्याने ते तासंतास घरात अभ्यास करत असत. १९६८ मध्ये त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा दाखला लेकसाइट या खासगी शाळेत करून दिला. त्यांचे गणित आणि विज्ञान हे विषय सर्वोत्तम होते. शाळेतल्या इतर गोष्टींमध्येदेखील ते हिरीरीने सहभागी होत असत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेव्हा कॉम्प्युटर शिकविला जात होता तेव्हापासून त्यांची रुची संगणकात वाढू लागली, ते आपला जास्तीत-जास्त वेळ कॉम्प्युटर समवेत घालवू लागले. पुढे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ते प्रोग्रामिंगमध्ये तरबेज झाले आणि एक सॉफ्टवेअर प्रोग्राम म्हणजेच प्रोग्रामिंग कॉम्प्युटरदेखील बनविला.

- Advertisement -

शालेय जीवनात असतानाच ते कॉम्प्युटर बनविण्यात तरबेज झाले होते, वयाच्या जेमतेम २० व्या वर्षी आपला मित्र पॉल एलन समवेत १९७५ मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी झाली आहे. १० नोव्हेंबर १९८३ ला त्यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोजची घोषणा केली आणि त्यानंतर दोन वर्षांनी १९८५ ला मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली. मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममुळे यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. २०१४ मध्ये त्यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि मायक्रोसॉफ्टच्या सीईओचे अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णतः दीन, गरजवंत, असहाय लोकांच्या मदतीकरिता आणि समाजसेवेकरिता समर्पित केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -