घरसंपादकीयदिन विशेषद्रष्ठ्ये समाजसुधारक हमीद दलवाई

द्रष्ठ्ये समाजसुधारक हमीद दलवाई

Subscribe

हमीद उमर दलवाई हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावी झाला. दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांमध्ये झाले.

हमीद उमर दलवाई हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावी झाला. दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांमध्ये झाले. हमीद यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रभावामुळे संघटनेची स्थापना केली. मुस्लीम महिलांचे प्रश्न, शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा याबद्दल कोणीच बोलत नाही. या प्रेरणेतून दलवाई यांच्यातील सुधारक जागा झाला आणि १८ एप्रिल १९६६ रोजी त्यांनी मुस्लीम महिलांचा मोर्चा मुंबई विधानसभेवर काढला. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करण्याची, समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे केली.

मुस्लीम महिलांनी त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काढलेला हा पहिला मोर्चा होता. दरम्यान, दलवाई यांची महाराष्ट्रातील बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांशी मैत्री झाली. त्यात अ. भि. शहांची मैत्री महत्वपूर्ण मानली जाते. त्यांच्या पुढाकारातून १९६८ मध्ये ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना झाली. सेक्युलॅरिझम, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मवादी राजकारण, परंपरा-अंधश्रद्धा अशा विषयावर मूलभूत मांडणी आणि योगदान देणारी ही संस्था बुद्धिजीवी तसेच सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचू शकत नाही हे लक्षात आले. हा विचार मुस्लीम समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने समतावादी मित्रांशी चर्चा करून २२ मार्च १९७० रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

- Advertisement -

समाज प्रबोधनाच्या संतुलित विकासात मुस्लीम समाजानेसुद्धा योगदान दिले पाहिजे हा यामागील उद्देश होता. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लीम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लीम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. अशा या द्रष्ठ्या समाजसुधारकाचे ३ मे १९७७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -