घरसंपादकीयदिन विशेषव्यासंगी चरित्रकार गंगाधर खानोलकर

व्यासंगी चरित्रकार गंगाधर खानोलकर

Subscribe

गंगाधर देवराव खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. गंगाधर खानोलकर हे मराठी लेखक, चरित्रकार होते. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९०३ रोजी रत्नागिरीतील खानोली गावी झाला. वडिलांच्या व्यावसायिक बदल्यांमुळे त्यांचे बालपण भ्रमंतीत गेले. प्राथमिक शिक्षण घरीच झाले.

गंगाधर देवराव खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. गंगाधर खानोलकर हे मराठी लेखक, चरित्रकार होते. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९०३ रोजी रत्नागिरीतील खानोली गावी झाला. वडिलांच्या व्यावसायिक बदल्यांमुळे त्यांचे बालपण भ्रमंतीत गेले. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिक परीक्षेस बसले नाहीत.

१९२० ते १९२३ या काळात त्यांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात, निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होऊन अनेक थोर विद्वानांचे व गुरू या नात्याने रवींद्रनाथांचे मार्गदर्शन प्राप्त केले. खूप वाचन, चिंतन-मननाची सवय लावून घेतली. येथील निखळ ज्ञानसाधकी शैक्षणिक संस्कारांची शिदोरी त्यांनी आयुष्यभर केलेल्या साहित्य सेवेत त्यांना सतत प्रेरणा देत राहिली.

- Advertisement -

त्यानंतर अमळनेर तत्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती घेऊन दोन वर्षे तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्यांनी काही काळ तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात शिक्षक या नात्याने काम केले. त्यानंतर ते मुंबईच्या वृत्तपत्राच्या दुनियेत ‘लोकहित’, ‘विविधवृत्त’, ‘प्रगती’, ‘रणगर्जना साप्ताहिक’ इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले. १९२६ च्या सुमारास मुंबईत स्थिर झाल्यावर ते वाङ्मयीन चळवळीशी बद्ध झाले. त्यांनी स्वतः अनुभवलेली संदर्भ-साहित्याची अडचण व उणीव दूर करण्यासाठी संशोधन क्षेत्रातील साधन साहित्याचा संग्रह सुरू केला आणि कोशकार, विश्लेषक, चरित्रलेखक, ग्रंथसंपादक म्हणून मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अविस्मरणीय अशी कामगिरी करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवला व पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला.

त्यांनी नामांकित नियतकालिकांतून कथा, वाङ्मयविषयक लेख प्रकाशित केले. ४५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या श्री.कृ.कोल्हटकरांच्या छोट्या चरित्राला साडेसहाशे ‘डेमी’ पृष्ठांचे स्वरूप प्राप्त करून दिले. खानोलकरांनी सतत २० वर्षे परिश्रमाने संग्रहीत केलेल्या साधनसामुग्रीच्या आधाराने दोन-तीन वर्षे लेखन करून हे साध्य झाले. अशा या थोर चरित्रकाराचे ३० सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -