घरसंपादकीयदिन विशेषमोहक बार्बी बाहुलीचा जन्मदिन

मोहक बार्बी बाहुलीचा जन्मदिन

Subscribe

लहान मुला-मुलींची आवडती बार्बी ही बाहुली ९ मार्च १९५९ रोजी अस्तित्वात आली. मॅटेल कंपनीच्या अध्यक्षा आणि बार्बीच्या निर्माणकर्त्या रुथ हँडलर यांनी अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली सर्वप्रथम जगासमोर सादर केली. रुथ यांनी आपल्या लहानग्या मुलीला अनेकदा कागदाने बनविलेल्या बाहुल्यांशी खेळताना पहिले होते. त्या कागदी बाहुल्या पाहून एक थ्री डायमेंशनल बाहुली तयार करण्याची कल्पना रुथ यांच्या मनामध्ये आकार घेऊ लागली.

जर्मनीमध्ये १९५२ मध्ये वर्तमानपत्रांतून प्रदर्शित होत असलेल्या कॉमिक स्ट्रीपमधील ‘बिल्ड लिली’ नामक बाहुलीवरून प्रेरणा घेत, तिच्याचसारखी दिसणारी बार्बी बाहुली तयार करण्यात आली. ही ‘लिली’ बाहुली रुथ यांनी युरोपमध्ये गेले असताना प्रथम पाहिली होती आणि त्यावरूनच त्यांनी तयार केलेली बाहुली कशी दिसायला हवी याचे एक पक्के चित्र त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत गेले.

- Advertisement -

बार्बीचे नामकरण रुथ आणि त्यांची मुलगी बार्बरा यांच्या नावांवरून करण्यात आले. त्यानंतर ‘केन’ हा बाहुला बार्बीचा भाऊ म्हणून अस्तित्वात आणला गेला. १९९० साली स्टेसी ही बाहुली बाजारामध्ये उपलब्ध झाली, तर केली नामक बाहुली १९९४ पासून २०१० पर्यंत उपलब्ध होती. २०११ साली केली बाहुलीची जागा चेल्सी या बाहुलीने घेतली. बार्बीची सर्वात ‘धाकटी बहीण’ क्रिसी ही बाहुली बार्बी आणि केनसोबत एका सेटमध्ये विकली गेली. या बार्बी बाहुलीचा जगभरात खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती लहान मुलांसोबतच सर्व वयोगटातील लोकांच्या मनाला भुरळ घालते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -