घरसंपादकीयदिन विशेषआधुनिक साहित्यिक भगवतीचरण वर्मा

आधुनिक साहित्यिक भगवतीचरण वर्मा

Subscribe

भगवतीचरण वर्मा यांचा आज स्मृतिदिन. भगवतीचरण वर्मा हे आधुनिक हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी होते. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९०३ रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाओ जिल्ह्यात शफीपूर या छोट्या खेड्यात झाला. जगमोहन विकसित यांच्या प्रेरणेने भगवतीचरण यांनी मैथिलीशरणांचे भारतभारती काव्य अभ्यासले व त्या प्रभावातून सातव्या इयत्तेत असल्यापासूनच ते स्वतः कविताही रचू लागले.

बी. ए. (१९२६), एल एल.बी. (१९२८) झाल्यावर १९३५ पर्यंत त्यांनी वकिली केली. काही काळ ते भदरी संस्थानाधिपतींच्या दरबारी होते. पुढे त्यांनी कोलकात्यात विचार साप्ताहिकाचे संपादक म्हणून (१९४०-४२) तसेच मुंबईत चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून (१९४२-४७) काम केले. १९४८ ते १९५७ पर्यंत ते लखनौ येथील नवजीवन या दैनिकाचे संपादक होते. १९५० पासून त्यांची आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर हिंदी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. उत्तर प्रदेशातील ‘भारती’ या साहित्यिक संस्थेचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले.

- Advertisement -

त्यांच्या साहित्यसेवेचा प्रारंभ कवितांनी झाला. ‘मधुकण’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘प्रेम-संगीत’ (१९३७) व ‘मानव’ (१९४०) हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले. मानवतावादी दृष्टिकोण त्यांच्या सर्व लेखनातून प्रकट होतो. ‘पतन’ ही त्यांची पहिली कादंबरी (१९२८). त्यानंतरची ‘चित्रलेखा’ (१९३३) ही त्यांची कादंबरी अत्यंत गाजली. ‘तीन वर्षं’ (१९३६), ‘टेढे-मेढे रास्ते’ (१९४७), ‘भूले-बिसरे चित्र’ (१९५९), अपने खिलौने’ (१९५७) या इतर कादंबर्‍याही विशेष गाजल्या.

‘बुझता दीपक’ (१९५०) हा एकांकिका-संग्रह, ‘रुपया तुम्हे खा गया’ (१९५५) हे नाटक महाकाल, कर्ण व द्रौपदी या नमोनाट्यांचा एकत्रित संग्रह आहे. ‘इन्स्टॉलमेंट’ (१९३६), ‘दो बाँके’ (१९४१), ‘राख और चिनगारी’ (१९५३), ‘मोर्चाबंदी’ (१९७६) हे त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांच्या ‘भूले बिसरे चित्र’ या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९६१) मिळाला. अशा या महान लेखकाचे ५ ऑक्टोबर १९८१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -