Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयदिन विशेषJagadishchandra Bose : वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस

Jagadishchandra Bose : वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस

Subscribe

डॉ. जगदीशचंद्र बोस हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी पूर्व बंगालमधील राणीखल येथे झाला. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे.

जगदीशचंद्र कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा व महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतीशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली.

- Advertisement -

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर ते वनस्पतीशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुख-दु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. त्यांनी थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण, निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.

त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेटस आदी उपकरणे तयार केली. अशा या विख्यात शास्त्रज्ञाचे २३ नोव्हेंबर १९३७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -