Homeसंपादकीयदिन विशेषLiterary Prabhakar Machve : साहित्य वाचस्पती प्रभाकर माचवे

Literary Prabhakar Machve : साहित्य वाचस्पती प्रभाकर माचवे

Subscribe

डॉ. प्रभाकर माचवे हे मान्यवर कवी आणि समीक्षक असून साहित्य वाचस्पती या उपाधीने ओळखले जात असत. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यांचे शिक्षण रतलाम व इंदूर येथे झाले. तत्त्वज्ञान आणि इंग्रजी साहित्य या दोन विषयांत आग्रा विद्यापीठाची एम.ए.ची पदवी त्यांनी संपादन केली. त्यांनी ‘भारतीय भाषा परिषदे’चे संचालक म्हणून काम पाहिलं होतं. काव्य, समीक्षा आणि भाषांतर या क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.

‘हिंदी व मराठी के निर्गुण काव्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर १९५८ मध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली. १९३८ ते १९४८ या काळात उज्जैनला तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग, साहित्य अकादमी, अमेरिका, श्रीलंका आणि जर्मनी येथील विद्यापीठे, भारतीय भाषा परिषद कलकत्ता इत्यादी अनेक संस्थांत त्यांनी प्रशासकीय व प्राध्यापक आदी विविध पदे भुषविली.

माचवे यांनी विविध प्रकारचे ऐंशीपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले असून त्यात कादंबरी, कविता, समीक्षा, एकांकिका, निबंध, चरित्र इत्यादी अनेक आकृतीबंधांचा समावेश आहे. त्यांत भाषांतरित ग्रंथांचाही समावेश आहे. त्यांच्या ग्रंथांचे अन्य भाषांमधून अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत.

त्यांना १९७२ सालचा सोविएट लँड नेहरू पुरस्कार मिळाला होता तसंच उत्तर प्रदेश शासनाचा राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला होता. स्वप्न भंग, अनुक्षण, तेल की पकौडियां, ‘विश्वकर्मा यांसारख्या काव्यसंग्रहांबरोबरच कबीर, राहुल संक्रीत्यायन, जगजीवनराम: व्यक्ती आणि विचार- अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रभाकर माचवे यांचे १७ जून १९९१ रोजी निधन झाले.