घर संपादकीय दिन विशेष प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, लेखिका इरावती कर्वे

प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, लेखिका इरावती कर्वे

Subscribe

इरावती दिनकर कर्वे यांचा आज स्मृतिदिन. इरावती कर्वे या विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्या. मानवंशशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये उल्लेखनीय संशोधनकार्य केले. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी म्यानमारमधील मिंगयानमध्ये झाला. लहान वयातच त्या शिक्षणासाठी पुण्यात आल्या. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विख्यात गणिती व तेव्हाचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांच्यामुळे त्या प्रभावित झाल्या. त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी संपादन केली (१९२६). नंतर त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमध्ये मानववंशशास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवली.

त्यांनी काही वर्षे मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिले. नंतर पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये इतिहास विषयाच्या प्रपाठक या पदावर त्या रुजू झाल्या. त्यांना प्राध्यापक पदावर बढती मिळाली (१९४९). डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी पुरातत्त्वविद्येमधील आजच्या मानवंशशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला व प्रारंभापासूनच हे संशोधन जागतिक पातळीच्या दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न केले. त्यांनी व सांकलिया यांनी गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले (१९४९).

- Advertisement -

या ठिकाणी मानवी अवशेषही मिळाले असल्याने हे संशोधन महत्वाचे ठरले. त्यांच्या किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया (१९५३) या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजरचनेच्या संदर्भात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट आणि नेमकी मांडणी केली. वांशिक व भाषिक गटांच्या दरम्यानचे फरक त्यांच्या बाह्य शरीररचनेच्या व आनुवंशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -