महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन. मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. त्यांना राष्ट्रपिताही म्हणतात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. जून १८९१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना भारतात व्यवसायासाठी बोलावण्यात आले. भारतात २ अनिश्चित वर्षे राहिल्यानंतर ते १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापार्याच्या दाव्यासाठी गेले.
ते २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम केला. १९१५ मध्ये, वयाच्या ४५ व्या वर्षी ते भारतात परतले आणि लवकरच अन्यायकारक जमीनकर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले.
१९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्वीकारली.
१९३० मध्ये त्यांनी असहकार चळवळीची स्थापना केली आणि १९४२ मध्ये त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगातदेखील गेले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. अशा या महान राष्ट्रपित्याचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले.