घरसंपादकीयदिन विशेषस्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते नानासाहेब गोरे

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते नानासाहेब गोरे

Subscribe

काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होत. 1948-53 मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे 1957-62 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला.

नारायण गणेश गोरे उर्फ नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म 15 जून 1907 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे या गावी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे बी.ए. एल.एल.बी. पर्यंत झाले. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. 1930 मध्ये महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले. 1936-39 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते.

काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होत. 1948-53 मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे 1957-62 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी 1955 मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती, परंतु 1957 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

- Advertisement -

नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. ‘समाजवादाचा ओनामा’ (1935) हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर 1942 पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी ‘कारागृहाच्या भिंती’ या नावाने 1945 मध्ये प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांचे प्रत्ययकारी चित्रण त्यात आढळते. ‘डाली’ (1956) हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. ‘शंख आणि शिंपले’ (1957) मध्ये त्यांच्या आठवणी आहेत. ‘सीतेचे पोहे’(1953) आणि ‘गुलबशी’ (1962) मध्ये त्यांच्या कथा संग्रहित केलेल्या आहेत. ‘आव्हान आणि आवाहन’ (1963), ‘ऐरणीवरील प्रश्न’ (1965) या पुस्तकांमध्ये त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. अशा या थोर समाजवादी नेते 1 मे 1993 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -