Homeसंपादकीयदिन विशेषGeorge Carver : अमेरिकन वनस्पतीतज्ज्ञ, संशोधक जॉर्ज कार्व्हर

George Carver : अमेरिकन वनस्पतीतज्ज्ञ, संशोधक जॉर्ज कार्व्हर

Subscribe

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकन वनस्पतीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1864 रोजी अमेरिकेच्या मिसुरी राज्यात झाला. त्यांचे आई-वडील मोझेस कार्व्हर या जर्मन गृहस्थांकडे गुलाम होते. बालवयात जॉर्जना वनस्पतींची आवड निर्माण झाली.

वनस्पती आणि प्राण्यांची चित्रे काढणे, रंगवणे त्यांचा छंद होता. रोपे लावणे, झाडे वाढवणे, पोषक माती तयार करणे अशा शेतकामांत ते निपुण होते. याखेरीज नैसर्गिक कीटकनाशके, कृमीनाशके, कवकनाशके बनवून वापरण्यातील कौशल्यामुळेही लोक त्यांना ‘वनस्पतीं’चा डॉक्टर म्हणू लागले.

त्यांना अमेरिकेतील त्या काळी असलेल्या काळ्या रंगामुळे शाळेत प्रवेश मिळणे अशक्य होते. त्यांनी वयाच्या विशीनंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्या काळात ते आयोवातील एकमेव ‘काळे’ महाविद्यालयीन विद्यार्थी होते. जॉर्ज यांनी चिकाटीने प्रा. लुईस पाम्मेल यांचे मार्गदर्शन घेऊन वनस्पती विकृतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली.

टस्कगी येथे बुकर यांच्या विनंतीला मान देऊन जॉर्ज यांनी कृषि संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली. जॉर्जनी प्रायोगिक शेतात, मातीत सुधारणा केल्या. कार्व्हर यांच्या प्रयत्नांमुळे 1896 मध्ये नगण्य प्रमाणात पिकणारा शेंगदाणा पुढील चार-पाच दशकात संपूर्ण अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे पीक ठरले. तसेच अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमधील दुसर्‍या क्रमांकाचे पीक झाले.

दुसर्‍या महायुद्ध काळात जॉर्ज यांनी अमेरिकन वस्त्रोद्योगासाठी सुमारे पाचशे रंजके (रंग) बनवले. परिणामी यूरोपमधून रंग आयातीचे परकीय चलन वाचू लागले. जॉर्जनी स्वत:च्या आयुष्यातील सारी शिल्लक टस्कगीतील कार्व्हर रिसर्च फाऊंडेशनला कृषी संशोधनासाठी दान केली. जॉर्ज कार्व्हर यांचे 5 जानेवारी 1943 रोजी निधन झाले.