घरसंपादकीयदिन विशेषसृजनशील लेखक गो. नी. दांडेकर

सृजनशील लेखक गो. नी. दांडेकर

Subscribe

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर यांना गोनीदा असेही म्हणतात. गोनीदा एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गोनीदा हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. त्यांचा जन्म गो. नी. दांडेकर यांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाही तर त्यानंतर ते गाडगे महाराजांचा संदेश पोहचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले.

पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या ‘पडघवली’ आणि ‘शितू’ या कादंबर्‍या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.

- Advertisement -

संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम ‘मोगरा फुलला’ या कादंबरीचे अभिवाचन केले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते.

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ‘गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती करताना ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा’ ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. अशा या थोर लेखकाचे १ जून १९९८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -