घरसंपादकीयदिन विशेषथोर क्रांतिकारक लाला लजपत राय

थोर क्रांतिकारक लाला लजपत राय

Subscribe

लाला लजपत राय हे भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते होते. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी पंजाबच्या धुंढिके येथे झाला.त्यांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एलएल. बी. ही पदवी मिळविली (१८८६) आणि अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली.

लहानपणापासूनच देशसेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारितासुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.

- Advertisement -

१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. १९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी त्यांनी वकिलीला रामराम ठोकला. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. १९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व रायांनी केले. अशा या थोर क्रांतिकारकाचे १८ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -