Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष थोर समाजसेवक भाऊ दाजी लाड

थोर समाजसेवक भाऊ दाजी लाड

Subscribe

रामकृष्ण विठ्ठल लाड उर्फ भाऊ दाजी लाड हे महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी होते. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२२ रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला आले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊंचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खासगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३).

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे.

- Advertisement -

जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. विधवा विवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रद्धेला फाटा द्यावा, या मताचे ते होते. वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणीचा बाग (जिजामाता बाग), अल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इन्स्टिट्यूट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते.अशा या थोर समाजसेवकाचे ३१ मे १८७४ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -