घरसंपादकीयदिन विशेषजल आहे, तर जीवन आहे...

जल आहे, तर जीवन आहे…

Subscribe

काय उपयोग तुमच्या पैशांचा,
आणि सोन्याच्या नाण्याचा,
जेव्हा नसेल तुमच्याकडे
एकही थेंब पाण्याचा…
म्हणूनच जल आहे, तर जीवन आहे…

पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे पाणी. सर्व सजीव शृंखला पाण्याभोवती गुंतलेली आहे, पाणी नाही तर तिचादेखील काही उपयोग होऊ शकत नाही, म्हणून असे पाण्याचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी २२ मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले आणि लगेच २२ मार्च १९९३ हा पहिला जागतिक जल दिन भारतात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

पृथ्वीवर ७१ टक्के पाणी असले तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे. बहुतांश पाणी समुद्रात आहे, जे पिण्यायोग्य नाही. त्यात अनेक क्षार मिसळले आहेत. पिण्यायोग्य असणार्‍या पाण्यातील बहुतांशी पाणी दोन्ही ध्रुव आणि हिमालय आदी पर्वतात गोठलेले आहे, जागतिक हवामानाचा विचार करता ते पाणी वापरणे फारसे योग्य नाही. परिणामी उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम तीन ते चार टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येते आणि त्या पाण्याचा वापर लोक फारच गैरप्रकारे करत आहेत.

जर पाणी अशाच प्रकारे प्रदूषित झाले तर लोकच नव्हे, तर समस्त प्राणीसृष्टी धोक्यात येऊ शकते. जगातील ८० टक्के लोक आजही शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. ४ प्राथमिक शाळांमागे एका शाळेत, मुलांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ती मुले अस्वच्छ पाणी पितात किंवा तहानलेली राहतात. त्यामुळेच आपण पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यात लोकांची पाण्याकडे पाहण्याची मानसिकता बदलायला पाहिजे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -