जोहान्स केप्लर हे जर्मन खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1571 रोजी वुटम्बर्गमधील विल (आताचे जर्मनीतील स्टटगार्ट) या शहरात झाला. ट्यूबिंगन विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केल्यावर ऑस्ट्रियातील ग्राझ विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. केप्लर हेे त्यांच्या गणितीय कौशल्य आणि सैद्धांतिक रचना यांच्या सर्जनशीलतेसाठी ओळखले जाऊ लागले. 1577 मध्ये त्यांच्या आईने त्यांना आकाशात एक मोठा धूमकेतू दाखवला. 1580 मध्ये त्यांचे वडील त्यांना चंद्रग्रहण पाहण्यासाठी रात्री बाहेर घेऊन गेले. या दोन संस्मरणीय घटनांमुळे खगोलशास्त्रात त्यांची आवड निर्माण झाली. तार्यांचा अभ्यास हा एक प्रकारचा धार्मिक अभ्यास आहे असे त्यांचे मत होते. ते खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकसचे सिद्धांत शिकले. त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले आणि त्या काळातील गॅलिलिओ आणि टायको ब्राहे या दोन खगोलशास्त्रज्ञांशी संवाद साधला.
1605 मध्ये केप्लर यांनी शोधून काढले की मंगळ ग्रह अंडाकृती-आकाराच्या कक्षेत फिरतो. चार वर्षांनंतर त्यांनी नवीन खगोलशास्त्र नावाच्या पुस्तकात त्यांचा शोध पाठवून केला. त्यांनी नंतर ग्रह कसे हलतात याबद्दल इतर शोध लावले आणि ते देखील प्रकाशित केले. या शोधांमुळे ग्रह सूर्याभोवती फिरतात या विषयीच्या सर्व शंका दूर झाल्या. आयझॅक न्यूटनने नंतर केप्लर यांच्या नियमांचा वापर करून सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम तयार केला. केप्लर यांनी खगोलशास्त्रीय दुर्बिणीचे सध्याचे स्वरूप शोधून काढले. त्यांच्या ऑप्टिक्समधील रसामुळे त्यांनी 1611 मध्ये प्रकाश आणि लेन्सचा पहिला वैज्ञानिक अभ्यास प्रकाशित केला. केप्लर यांचे 15 नोव्हेंबर 1630 रोजी रेगेन्सबर्ग, बव्हेरिया (आता जर्मनी) येथे निधन झाले.
Johannes Kepler : जर्मन खगोलशास्त्रज्ञ योहान्स केप्लर
written By My Mahanagar Team
Mumbai