घरसंपादकीयदिन विशेषन्यायाधीश, लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी

न्यायाधीश, लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी

Subscribe

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर १९२७ रोजी रायपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरचे एस.बी. सिटी कॉलेज आणि नोशेर महाविद्यालय येथे झाले. १९४९ मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. नंतर नागपूर विद्यापीठातून १९५२ मध्ये एम.ए. आणि विद्यापीठ कायदा महाविद्यालयातून १९५४ मध्ये एलएलबी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. 2 वर्षे जिल्हा न्यायालयात वकिली केली. त्यानंतर नागपूर उच्च न्यायालयात वकील म्हणून रुजू झाले. नंतर ऑक्टोबर १९७० मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून झाली. नंतर १९७२ मध्ये ते मंबई उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९८९ मध्ये ते पदावरून निवृत्त झाले.
उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत न्या. धर्माधिकारी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये आणीबाणी लागू असतानाच्या काळातील नागरिकांचा जगण्याचा हक्क, स्त्रियांचे हक्क, मनोरुग्णांचे, कैद्यांचे व आदिवासी मुलांचे हक्क इत्यादी विविध प्रश्नांवरील किंवा मुद्यांवरील निकालांचा उल्लेख करता येईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर न्या.धर्माधिकारी यांचे प्रभुत्व होते. या तिन्ही भाषांतील त्यांचे वक्तृत्व सारखेच प्रभावी होते आणि तिन्ही भाषांत त्यांनी घटना व कायदा आणि त्याशिवाय अन्य विविध विषयांवर 16 पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. अशा या थोर न्यायाधीशाचे ३ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -