घरसंपादकीयदिन विशेषजागतिक बुद्धिबळ दिन

जागतिक बुद्धिबळ दिन

Subscribe

‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस २० जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचेच प्राथमिक रूप. बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे.

स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. १८८६ मध्ये विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय खेळाडू २०१२ पर्यंत जगज्जेता होता. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा ‘बुद्धिबळ ऑलिंपियाड’ दर दोन वर्षांतून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडन्स चेस फेडरेशन या जगातील महत्वाच्या स्पर्धा भरवतात.

- Advertisement -

बुद्धिबळ खेळणार्‍या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह (त्यावेळचा जगज्जेता) आणि आय.बी.एम. कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धिमान/कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले. जरी अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी बुद्धिबळ या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली असे सध्यातरी मानले जाते.

बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत, यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे ‘सैन्याची चार अंगे’ पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते. साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकयमध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. पर्शियामधील पहिला संदर्भ ६०० च्या दरम्यान आढळतो; येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -