घरसंपादकीयदिन विशेषतत्त्वज्ञ, विचारवंत मे. पुं. रेगे

तत्त्वज्ञ, विचारवंत मे. पुं. रेगे

Subscribe

मेघश्याम पुंडलिक रेगे उर्फ मे. पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांंचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे नगरपालिका शाळेत झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, किंग जॉर्ज हायस्कूल मुंबई आणि महाविद्यालयीन शिक्षण बी.ए. तत्त्वज्ञान एल्फिस्टन महाविद्यालय, एम. ए. चे शिक्षण मुंबई विद्यापीठ येथे झाले.

महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्विवाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला.‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’,‘तत्त्वज्ञानातील समस्या’ ही भाषांतरे, ‘नवभारत (मासिक)’ मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पाहता रेगे यांच्या कार्याची, पश्चिमी तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची खात्री पटेल.

- Advertisement -

मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा-स्थिती आणि भवितव्य या विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. अशा या व्यासंगी तत्त्वज्ञाचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -