शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी तत्कालीन जम्मू आणि काश्मीर संस्थानातील जम्मू येथे झाला. त्यांचे वडील उमा दत्त शर्मा हे गायक आणि तबलावादक होते. पाच वर्षांचे असताना त्यांना वडिलांनी गायन आणि तबला शिकवायला सुरुवात केली. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या तेराव्या वर्षी संतूर शिकण्यास सुरुवात केली. 1955 मध्ये त्यांनी मुंबईत पहिला सार्वजनिक कार्यक्रम सादर केला. शर्मा यांना संतूरला लोकप्रिय भारतीय शास्त्रीय संगीत वाद्य म्हणून सादर करण्याचे श्रेय जाते. शर्मा यांनी भारतीय तबलावादक झाकीर हुसेन आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत त्यांच्या अनेक परफॉर्मन्समध्ये तसेच अल्बममध्ये भाग घेतला. संतूर या तितक्याशा प्रसिद्ध नसलेल्या वाद्याला त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. शिवकुमार शर्मा यांनी व्ही. शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे (1955) चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत तयार केले, ज्यामध्ये गोपी कृष्णाने कथ्थक नृत्य सादर केले. सिलसिलापासून शिव-हरी संगीत जोडी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट संगीतमय हिट होते, जसे की फासले (1985), चांदनी (1989), लम्हे (1991) आणि डर (1993). शर्मा यांची लॉस एंजेलिसमधील 1968 मधील मैफिल ही त्यांची परदेशातील पहिली कामगिरी होती. त्यानंतर त्यांनी 1970 मध्ये इंग्लंडचा दौरा केला. शर्मा यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मभूषण प्रदान करण्यात आला. शिवकुमार शर्मा यांचे 10 मे 2022 रोजी निधन झाले.
Shivkumar Sharma : प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा
written By My Mahanagar Team
Mumbai