घरसंपादकीयदिन विशेषयुगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर

युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर

Subscribe

बाळ सीताराम मर्ढेकर हे अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी तसेच नवकविता व नवटीका यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी सातार्‍यातील मर्ढे येथे झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खान्देशात धुळे येथे घेतल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. १९२९ साली आय. सी. एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील वाङ्मयीन चळवळींचा त्यांनी अभ्यास केला.

लंडनच्या ‘किंग्ज कॉलेजा’त शिकत असताना प्राध्यापक जेम्स सदरलंड यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १९३२ मध्ये ते भारतात परतले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचे सहसंपादक धारवाड, मुंबई, अहमदाबाद येथील सरकारी महाविद्यालयांतील प्राध्यापक अशा नोकर्‍या त्यांनी केल्या, परंतु त्यात ते रमले नाहीत. १९३८ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रेडिओत नोकरी पत्करली आणि अखेरपर्यंत ते त्या नोकरीत राहिले.

- Advertisement -

‘कविता काही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१), कांदबर्‍या-‘रात्रीचा दिवस’ (१९४२), ‘तांबडी माती’ (१९४३), ‘पाणी’ (१९४८) ‘नाटक’ (१९४४), ‘संगीतिका’ (१९४४), ‘संगम’ (१९४५), ‘औक्षण’ (१९४६), ‘बदकांचे गुपित’ (१९४७), ‘समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय-आर्ट्स अँड मॅन’ (१९३७), ‘वाङ्मयीन महात्मता’ (१९४१), ‘टू लेक्चर्स ऑन इस्थेटिक ऑफ लिटरेचर’ (१९४१), ‘सौंदर्य आणि साहित्य’ (१९५५) इत्यादी साहित्य त्यांनी लिहिले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जात असली, तरी पूर्वपरंपरेशी तिचे निश्चित नाते आहे. ओवी-अभंग लिहिणार्‍या संतांच्या मनोभूमिकेशी मर्ढेकरांची स्वतःची भूमिकाही अनेक ठिकाणी जुळते. अशा या युगप्रवर्तक कवीचे २० मार्च १९५६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -