घरसंपादकीयदिन विशेषकवी, समीक्षक गजानन मुक्तिबोध

कवी, समीक्षक गजानन मुक्तिबोध

Subscribe

गजानन माधव मुक्तिबोध हे आधुनिक काळातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत होते. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ रोजी ग्वाल्हेर येथील श्योपूर येथे झाला. उज्जैनच्या महाविद्यालयातून इंटरमीजिएट व इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून १९३८ मध्ये ते बी. ए. झाले. १९५३ मध्ये हिंदी विषय घेऊन ते नागपूर विद्यापीठातून एम. ए. झाले. प्रारंभी बडानगर येथे व नंतर शुजालपूर, उज्जैन, कोलकाता, इंदूर, मुंबई, बंगळुरू, बनारस, जबलपूर या ठिकाणी त्यांनी शिक्षक, आकाशवाणीत प्रोग्रॅमर, पत्रकार इत्यादी नोकर्‍या केल्या. निर्वाहासाठी पाठ्यपुस्तके लिहिली. १९५८ पासून राजनांदगाव येथे दिग्विजय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

‘कामायनी : एक पुनर्विचार’(१९६१, समीक्षा), ‘नई कविता का आत्मसंघर्ष तथा अन्य निबंध’(१९६४, समीक्षा),‘नये साहित्यका सौंदर्यशास्त्र’(समीक्षा), ‘चाँद का मुँह टेढा है’(१९६४, काव्यसंग्रह), ‘एक साहित्यिक की डायरी’(१९६४, साहित्यासंबंधी चिंतनपर निबंध), ‘काठ का सपना’(कथासंग्रह), ‘विपात्र’(लघुकादंबरी), ‘सतह से उठता आदमी’(कथासंग्रह),‘भूरी भूरी खाक धूल’(काव्यसंग्रह) या त्यांच्या ग्रंथांपैकी बरेच ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. त्यांच्या अप्रकाशित व प्रकाशित सर्व साहित्याचे सहा खंड मुक्तिबोध रचनावली शीर्षकाने प्रकाशित झाले आहेत (१९८०).

- Advertisement -

मुक्तिबोध मृत्यूनंतर हिंदीतील एक युगनिर्माते कवी म्हणून मान्यता पावले. कारण त्यांची कविता संकलित रूपाने त्यांच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झाली. शिवाय सांस्कृतिक संदर्भाचा प्रचंड ठसा घेऊन निर्माण झालेल्या त्यांच्या कवितेचा हिंदीच्या साठनंतरच्या जनवादी प्रवृत्तींशी खूपच दुवा जुळला. त्यांची बहुसंख्य कविता आकाराने दीर्घ आहे याचे कारण त्यांतील सामाजिक-राजनैतिक-सांस्कृतिक विराट आशय हे होय. मुक्तिबोधांचा जीवनद्दष्टिकोन मार्क्सवादी विचारसरणीकडे झुकलेला असला, तरी ते कवीच्या स्वातंत्र्याचे आणि कवितेच्या स्वायत्ततेचे समर्थक होते. अशा या थोर समीक्षकाचे ११ सप्टेंबर १९६४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -