घर संपादकीय दिन विशेष रणधुरंधर पहिले बाजीराव पेशवे

रणधुरंधर पहिले बाजीराव पेशवे

Subscribe

पहिले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी पुण्यात झाला. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट हे बाजीरावांचे वडील. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले. शिपाईगिरी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा त्यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. त्यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

बाळाजींच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे, शिक्केे, कट्यार पहिले बाजीराव यांना दिली. बाजीराव अतिशय शूर होते. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांनी २० वर्षांत अनेक लढाया केल्या. त्यामध्ये ४७ मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि सगळ्याच लढाया ते जिंकले. उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता.

- Advertisement -

पहिल्या बाजीरावांनीच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवून दिले. त्यांच्यामुळे भारतीय उपखंडात राजकीय पुनर्रचना झाली. शिवरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला. बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्ये सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवले, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर स्वराज्याचा विस्तार केला. अशा या रणधुरंधर पेशव्याचे २८ एप्रिल १७४० रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -