Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयदिन विशेषSuryakant Tripathi : हिंदी कवी, लेखक सूर्यकांत त्रिपाठी निराला

Suryakant Tripathi : हिंदी कवी, लेखक सूर्यकांत त्रिपाठी निराला

Subscribe

सूर्यकांत त्रिपाठी निराला हे प्रख्यात हिंदी कवी होते. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १८९९ रोजी बंगालमधील मेदिनिपूर येथे एका कान्यकुब्ज ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे उत्तर प्रदेशातील उन्नाओ जिल्ह्यातील आहे. त्यांचे बालपण बंगालमध्ये गेल्यामुळे मातृभाषा बंगाली. गरिबीमुळे त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले.

मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने ते हिंदी भाषा शिकले आणि तीत साहित्यनिर्मितीही करू लागले. काव्याशिवाय त्यांनी कथा, कादंबर्‍या आणि निबंधही लिहिले. समन्वय, मतवाला, सुधा इ. नियतकालिकांचे संपादनही त्यांनी काही काळ केले. एकूण ४४ ग्रंथ त्यांच्या नावावर आढळतात. ते नवे नवे प्रयोग करणारे साहसी कवी होते.

हिंदीमध्ये मुक्तछंदात कविता लिहिण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यांच्या अभिव्यक्तीवर बंगाली आणि इंग्रजी भाषांतील काव्याचा प्रभाव दिसतो. निरालांचे एकूण काव्य वैविध्यपूर्ण आहे. शृंगार, कारूण्य, वात्सल्य, हास्य, उपरोध यांनी ते संपन्न आहे. ‘भिक्षुक’, ‘वह तोडती पत्थर’, ‘बनबेला’, ‘कुकुरमुत्ता’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यांनी लिहिल्या.

निरालांची काव्याची समज अतिशय प्रगल्भ होती आणि समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी अप्सरा, अलका, निरुपमा, प्रभावती, कुल्लीभाट, बिल्लेसुर बकरिहा, चोटी की पकड या कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या कथा लिली, सखी, सुकुल की बीबी व चतुरी चमार यांत संगृहीत आहेत.

त्यांचे निबंध प्रबंध पद्म, प्रबंध प्रतिमा, चयण, चाबूक व संग्रहमध्ये संकलित आहेत. अनामिका, परिमल, गीतिका, तुलसीदास, कुकरमुत्ता, अणिमा, बेला, नए पत्ते, अर्चना, आराधना, गीतगुंज इ. त्यांचे काव्यसंग्रह होत. सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे १५ ऑक्टोबर १९६१ रोजी निधन झाले.