घरसंपादकीयदिन विशेषप्रतिभावंत लेखक व. पु. काळे

प्रतिभावंत लेखक व. पु. काळे

Subscribe

वसंत पुरुषोत्तम उर्फ व.पु. काळे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. त्यांचा जन्म २५ मार्च १९३२ रोजी झाला. त्यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा असा त्यांचा विनोद असे. विशेषत: तरुणाईच्या मनावर वपुंनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून गारूड केले होते. जगणे हीसुद्धा एक कला आहे, ती आपण अवगत करायला हवी, असा संदेश ते अगदी सहज देऊन जात असत. वपु या २ शब्दावर तमाम रसिक अजूनही प्रेम करत आहेत. त्यांचे विचार आदानप्रदान करत आहेत.

वपु मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते, पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मराठी मातृभाषेत लिहिली याला तोड नाही. वपुंचे मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, समृद्ध करणारे आहे. ‘आपण सारे’, ‘अर्जुन’, ‘गुलमोहर’, ‘गोष्ट हातातली होती’, ‘घर हरवलेली माणसं’, ‘दोस्त’, ‘माझ्या माझ्यापाशी’, ‘मी माणूस शोधतोय’, ‘वन फोर द रोड’, ‘रंग मनाचे’, ‘माणूस’, ‘वपुर्झा’, ‘हुंकार’ असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खूपच प्रसिद्ध आहेत.

- Advertisement -

तसेच ‘तप्तपदी’ ‘ठिकरी’ व ‘वाट एकटीची’ यासारख्या कादंबर्‍या खूपच गाजल्या. वपुंनी ६० पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले. त्यातील पार्टनर, वपूर्झा, ही वाट एकटीची यांचे कथाकथन त्यांनी स्वतः केले. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आणि ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपु पहिले लेखक ठरले. अशा या प्रतिभावंत लेखकाचे २६ जून २००१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -