Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष नाट्य-अभिनेते चिंतामणी गोविंद पेंडसे

नाट्य-अभिनेते चिंतामणी गोविंद पेंडसे

Subscribe

चिंतामणी गोविंद पेंडसे उर्फ मामा पेंडसे हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1906 रोजी सांगली येथे झाला. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसेबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती. मामांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन मिळे. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने मामा पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत शिरले. लहानपणापासून पेंटिंगची आवड होतीच. नाटकांतील पडदे रंगवणार्‍या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा हा मामांचा उद्देश होता. शिवाय नट व्हायला वडिलांनी परवानगीही दिली नव्हती. नट म्हणजे अशिक्षित, दुराचारी व व्यसनी माणूस अशी तेव्हाची समजूत होती. सुरुवातीला मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली. मामांचा दुधाचा व्यवसायही होता. केवळ नाटकांतून मिळणार्‍या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. दुधाचा धंदा चालू असतानाच १९३६ साली मामांनी ‘रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ‘आग्र्याहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ‘समर्थ नाटक मंडळी’, ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली. अशा या महान नटवर्याचे १२ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -