Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयदिन विशेषLeo Tolstoy : विचारवंत, कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय

Leo Tolstoy : विचारवंत, कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय

Subscribe

लिओ टॉलस्टॉय हे रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी आणि शिक्षणसुधारक होते. त्यांचा जन्म तूला प्रांतातील यास्न येथे ९ सप्टेंबर १८२८ रोजी झाला. कझॅन विद्यापीठात १८४४ ते १८४७ पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कॉकेशसमध्ये सैन्यात नोकरी केली. क्रिमियन युद्धात सिव्हॅस्तपोलच्या लढाईत त्यांनी भाग घेतला. द

र्जेदार कादंबरी लेखनामुळे, विशेषकरून ‘वॉर अँड पीस’ आणि ‘आना कारेनिना’ या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे टॉलस्टॉय महान साहित्यिक मानले जातात. त्यांच्या ‘किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू’ या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २० व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वाद्वारे भारताची स्वातंत्र्य चळवळ चालवली. ते टॉलस्टॉय यांना आपले प्रेरणास्थान मानत.

- Advertisement -

टॉलस्टॉय यांच्या अन्य महत्त्वाच्या लेखनकृतींमध्ये ष्मेर्त इवाना इलिचा, क्रेश्तसरोवा सनाता, हाजी मुरात (१९०४), पोस्लि बाला व अन्य साहित्यकृतींचा अंतर्भाव होतो. टॉलस्टॉय हे उत्तम नाटककारही होते. १८८६ मध्ये रशियन खेड्याबद्दल त्यांनी व्लास्त तमी या नावाचे एक उत्कृष्ट नाटक लिहिले.

१९०० मध्ये टॉलस्टॉयने झिवोय् त्रूप् या नावाने एक मनोरंजक नाटक लिहिले. टॉलस्टॉय हे एक मोठे तत्त्वज्ञ होते. १८८० ते १८८९ या दशकात त्यांनी अनेक लेख व कथा लिहिल्या. टॉलस्टॉयच्या कलेने रशियन वाङ्मयीन इतिहासात एक संपूर्ण युग निर्माण केले आहे. अशा या सुप्रसिद्ध लेखकाचे २० नोव्हेंबर १९१० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -