घरसंपादकीयदिन विशेषथोर लेखिका दुर्गा भागवत

थोर लेखिका दुर्गा भागवत

Subscribe

दुर्गा भागवत या मराठी लेखिका होत्या. वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यात लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला.

त्यांचे शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे झाले. १९२७ मध्ये त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ मध्ये शिक्षण स्थगित करून महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम.ए. झाल्या. गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे (१९५८-६०) समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या.

- Advertisement -

तसेच साहित्य-सहकार या मासिकाचे वर्षभर (१९५७) संपादनही त्यांनी केले. हे अपवाद वगळल्यास त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापासून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ ‘अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्प्रुडन्स’ (१९३८) हा होय. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ ‘राजारामशास्त्री भागवत’ होय. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला.

समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. अभिजात रसिकता, सौंदर्यसक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृत्ती, तीव्र संवेदनशीलता, तत्त्वज्ञवृत्ती, काव्यात्मता तसेच शास्त्राज्ञाचे डोळस, मर्मग्राही कुतूहल यांचे अपूर्व रसायन दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात आणि अनुषंगाने त्यांच्या ललित साहित्यात प्रत्ययास येते. भावमुद्रा (१९६०), पैस (१९७०), डूब (१९७५) या संग्रहातून कसदार ललितलेखनाचा एक स्वतंत्र बाज दिसून येतो. त्यांच्या पैस या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे (१९७१). अशा या थोर लेखिकेचे ७ मे २००२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -