Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयदिन विशेषTrimbak Shejwalkar : इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर

Trimbak Shejwalkar : इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर

Subscribe

त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक व इतिहासकार होते. त्यांचा जन्म 25 मे 1895 रोजी राजापूरमधील कशेळी येथे झाला. त्यांनी मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून मॅट्रिक (1911) व विल्सन महाविद्यालयातून बी.ए. (1917) केले. पुण्यात असताना ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले.

त्यांना प्रबंधाद्वारे एम.ए. ही पदवी घ्यावयाची होती, म्हणून ते मुंबईस आले. ‘मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव’ हा प्रबंध त्यांनी मुंबई विद्यापीठास सादर केला, परंतु परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही. पुढे हा इंग्रजी प्रबंध पुस्तकरूपात प्रकाशित झाला (1998).

- Advertisement -

कर्नाटक छापखान्याने (मुंबई) काढलेल्या प्रगति साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले (1929-32) आणि त्याद्वारे अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले. ‘दत्तोपंत आपटे : व्यक्तिदर्शन’ (1945), ‘पानिपत’ : 1761 (इंग्रजी-1946), ‘निजाम-पेशवे संबंध’ (1959), ‘पानिपत’ : 1761 (मराठी-1961) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास हा त्यांचा अभ्यासविषय होता. पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली, तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरून त्यांनी कठोर चिकित्सा केली.

- Advertisement -

स्वातंत्र्य, समता व बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीमुळे शेजवलकर प्रभावित झाले होते. या तत्त्वांच्या निकषावर त्यांनी वेळोवेळी केलेली ऐतिहासिक चिकित्सा अभ्यसनीय आहे. भूतकाळाबाबत अशी चर्चा करतानाच वर्तमानाच्या संदर्भात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या दोहोंचा मेळ घालण्यावर त्यांनी भर दिला. अशा थोर इतिहास संशोधकाचे 28 नोव्हेंबर 1963 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -