Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयदिन विशेषVasudeo Sitaram Bendrey : इतिहास संशोधक, लेखक वा. सी. बेंद्रे

Vasudeo Sitaram Bendrey : इतिहास संशोधक, लेखक वा. सी. बेंद्रे

Subscribe

वा. सी. तथा वासुदेव सीताराम बेंद्रे हे मराठी भाषेतील इतिहासकार, लेखक, संपादक, अनुवादक आणि प्रकाशक होते. त्यांना मराठी इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाते. त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संशोधनासाठी आपले कार्य समर्पित केले आणि विविध इतिहास विषयांवर ६० हून अधिक पुस्तके लिहिली, संपादित केली आणि अनुवादित केली. बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९4 रोजी पेण येथे झाला. त्यांनी मुंबईतील विल्सन हायस्कूलमध्ये मॅट्रिक पूर्ण केले.

बेंद्रे ह्यांचा पहिला ग्रंथ साधनचिकित्सा हा होय. मराठी इतिहासावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. तथापि छत्रपति संभाजी महाराज हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संत तुकाराम महाराजांबद्दलही बेंद्रे ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. १९५० मध्ये श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजकृत श्रीमद्भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता त्यांनी संपादिली.

देहूदर्शन, तुकाराम महाराज ह्यांचे संतसागाती, तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा आणि संत तुकाराम हे त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ आहेत. त्यांच्या अन्य ग्रंथांत सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कृतबशाही, अ स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरिअड व श्री छत्रपती शिवाजी महाराज इ. ग्रंथांचा त्यात समावेश होतो. तारीख-इ-इलाही, राजाराम चरितम हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ होत.

त्यांच्या पुढाकाराने सन १९६५ मध्ये महाराष्ट्रेतिहास परिषद ही संस्था सुरू झाली. १९६३ पासून मुंबई इतिहास संशोधन मंडळाचे ते संचालक झाले. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे मुख्य कार्यवाह झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते त्यांना राज्य पारितोषिक मिळाले. याशिवाय मालोजी, शहाजी, शिवाजी महाराज या ग्रंथांना महाराष्ट्र राज्याची चार पारितोषिके मिळाली. अशा या महान इतिहासकाराचे १6 जुलै १९८६ रोजी निधन झाले.