घरसंपादकीयदिन विशेषजागतिक रेडिओ दिन

जागतिक रेडिओ दिन

Subscribe

जागतिक रेडिओ दिन १३ फेब्रुवारी २०१२ पासून साजरा केला जातो. यानिमित्त इटलीमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला. याचे आयोजन इटालॅडियोज संस्था, अभियांत्रिकी आणि दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात आले होते. २०११ मध्ये युनेस्कोच्या ३६ व्या सत्रामध्ये ‘जागतिक रेडिओ दिन’ची घोषणा करण्यात आली. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ मध्ये केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात रेडिओची सुरुवात १९२३ मध्ये रेडिओ क्लब येथे झाली.

भारतात ‘बीबीसी’च्या धर्तीवर इंग्रज सरकारने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ची स्थापना केली. १९२७ मध्ये पहिल्यांदा याचे प्रसारण सुरू झाले, तर १९३२ मध्ये बातम्यांचे प्रसारण होऊ लागले. रेडिओचा वापर दुसर्‍या महायुद्धात बातम्या देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमांतून हे रेडिओ सेट तयार केले जात असत. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. १९५० नंतर प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली. १९५४ मध्ये लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान-मोठे रेडिओ तयार होत गेले.

- Advertisement -

लहान आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले. त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले. चिनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. १९७७ मध्ये भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -