रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यात भारताची भूमिका महत्वपूर्ण!

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका या दोन देशांनाच बसला नाही, तर युरोपसह संपूर्ण जगावर त्याचा परिणाम झाला आहे. या युद्धामुळे केवळ अन्नधान्याचे संकटच निर्माण झाले नाही, तर इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम झालाय. त्यामुळे जगभर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धामुळे युक्रेनमध्ये केवळ जीवित आणि मालमत्तेची हानी झाली नाही, तर एक ना एक प्रकारे जगभरातील लोक प्रभावित झालेत. मानवतेपुढे निर्माण झालेले हे संकट सर्वजण मान्य करतात, पण युद्ध थांबवण्याची गरज आहे हे सांगायला कोणीही पुढे येत नाही. हे युद्ध थांबवण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरले ही चिंतेची बाब आहे. जी-20 गटाचा अध्यक्ष या नात्याने भारताने हे युद्ध संपुष्टात आणण्याच्या शक्यतांचा शोध घेणे योग्य ठरेल.

युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे, पण युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास एक वर्ष होत आलं तरी ते अद्यापही धुमसतंय, मात्र अजूनही तेथील परिस्थिती सामान्य झालेली नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनविरुद्ध युद्ध घोषित केल्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. खरेतर त्यानंतर रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेन एकटा पडताना दिसत होता, परंतु मागील काही दिवसांपासून अमेरिकेने या युद्धात अप्रत्यक्षरीत्या उडी घेतल्याचं बोललं जातंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकमेकांविरोधात ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत, त्यामुळे हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता धूसर वाटत आहे. उलट या नेत्यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढताना दिसत आहे. रशियाला शस्त्रास्त्रे देण्यावरून अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे, पण त्याची पर्वासुद्धा चीननं केलेली दिसत नाही.

रशिया-युक्रेन हे युद्ध कोणत्या टप्प्यावर पोहोचेल माहीत नाही, पण युक्रेनवर हल्ला करून रशियाला काय मिळाले याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. युक्रेनवर ज्या प्रकारे रशियाने हल्ले सुरू ठेवलेत, त्यावरून अद्यापही पुतिन यांनी ठरवलेले उद्दिष्ट ते साध्य करू शकलेले नाहीत. त्यांनी युक्रेनचे काही भाग काबीज केले असतील, परंतु ते ताब्यात ठेवण्यास सक्षम असतील की नाही हे अद्यापही अस्पष्ट आहे. कारण युक्रेनियन सैन्याने अमेरिका आणि नाटोच्या लष्करी पाठिंब्याने रशियन सैन्याशी लढा दिलाय. आता तर त्यांची हिंमत अधिकच वाढली आहे. कारण युक्रेन सहज कोसळेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही.

नाटोच्या पाठिंब्यामुळे युद्धविराम होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याप्रमाणे रशिया युद्धात आपली संसाधने ओतत आहे, त्याचप्रमाणे युक्रेन आणि त्याचे नाटो सहयोगी आहेत. दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत, पण संवादाच्या माध्यमातून हे युद्ध संपवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. ज्याप्रमाणे रशियाला युक्रेनचा काही भाग जोडून काय मिळवायचे आहे हे समजत नाही, त्याचप्रमाणे युक्रेन हे अक्षरश: पश्चिमेचे प्यादे होऊन बसले आहे, हे युक्रेनच्या लक्षात येत नाही.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका या दोन देशांनाच बसला नाही, तर युरोपसह संपूर्ण जगावर त्याचा परिणाम झाला आहे. या युद्धामुळे केवळ अन्नधान्याचे संकटच निर्माण झाले नाही, तर इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम झालाय. त्यामुळे जगभर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धामुळे युक्रेनमध्ये केवळ जीवित आणि मालमत्तेची हानी झाली नाही, तर एक ना एक प्रकारे जगभरातील लोक प्रभावित झालेत. मानवतेपुढे निर्माण झालेले हे संकट सर्वजण मान्य करतात, पण युद्ध थांबवण्याची गरज आहे हे सांगायला कोणीही पुढे येत नाही. हे युद्ध थांबवण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरले ही चिंतेची बाब आहे. जी-20 गटाचा अध्यक्ष या नात्याने भारताने हे युद्ध संपुष्टात आणण्याच्या शक्यतांचा शोध घेणे योग्य ठरेल.

युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अचानक कीव्हमध्ये येऊन अनेक महत्त्वाचे संदेश दिले. या दौर्‍याची घोषणा आधीच केलेली नसली तरी योजना विचारपूर्वक आखलेली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारे युद्धक्षेत्रात पोहोचणे हे कोणत्याही परिस्थितीत सामान्य मानले जाऊ शकत नाही. हे निश्चितपणे युक्रेनला अमेरिकेचे सतत समर्थन आणि मदतीचा एक मजबूत संकेत आहे. युक्रेनला भविष्यात किती आणि कोणत्या प्रकारची मदत द्यायची यावरून अमेरिकेत राजकीय मतभेद वाढत असताना ही घटना घडली आहे. बरं बायडेन यांचा दौरा संपताच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी युक्रेनला आणखी 450 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत जाहीर केली. अमेरिकेने आतापर्यंत त्यांना 24.9 अब्ज डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे.

दोन्ही बाजूंची तयारी पाहता एक वर्ष पूर्ण झाल्यावर युद्ध आणखी तीव्र होईल, असे आधीच बोलले जात होते. दुसरीकडे युक्रेनचा शेजारी देश असलेला पोलंडही आपली लष्करी ताकद वाढवत आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने पोलंडला 10 अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्र कराराला मंजुरी दिली आहे. अमेरिका पोलंडला रॉकेट लाँचर, मिसाईल आणि इतर शस्त्रास्त्र देणार आहे. या पॅकेजमध्ये 18 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम, 45 आर्मी टेक्निकल मिसाईल सिस्टीम, गायडेट मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम आणि इतर शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. खरेतर युक्रेनवर रशियानं हल्ला केल्यानंतर पोलंड स्वत:ची लष्करी ताकद वाढवण्यात दंग आहे. त्यासाठी अमेरिकाही पोलंडला मदत करीत आहे. खरेतर संधी मिळाल्यास पोलंड युक्रेनसोबत या युद्धात उडी घेण्याचीही शक्यता आहे.

रशियन हल्ल्यातील संभाव्य वाढ पाहता युक्रेन शस्त्रास्त्रे गोळा करण्यात गुंतले होते. चीनने या युद्धात रशियापासूनचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही बोलले जात होते. चीन रशियाला शस्त्रास्त्रे पुरवणार असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. याबाबत त्यांनी चीनला इशाराही दिला असून त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही आक्रमक वृत्ती दाखवली आहे. तसे युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन चीनला गेले होते. तेव्हा दोन्ही देशांनी सांगितले होते की, त्यांच्या मैत्रीला मर्यादा नाही. आता युद्ध दुसर्‍या वर्षाकडे वाटचाल करीत असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाला जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यांना रशियाकडून निमंत्रण मिळाले आहे. असे झाल्यास अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील तणाव आणखी वाढेल. दरम्यान, पुतिन यांनी मंगळवारी सांगितले की, ते अमेरिकेसोबत 2011 मध्ये लागू झालेला अण्वस्त्र नियंत्रण करार स्थगित करणार आहेत. तसे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या महिन्यात एका अहवालात दावा केला होता की, रशिया या कराराचे उल्लंघन करीत आहे.

रशियासोबतचे युद्ध सोडवण्यासाठी भारत शांततादूताची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनला वाटते. अजित डोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात झेलेन्स्की कार्यालयाच्या प्रमुखांनी युद्धाच्या ताज्या परिस्थितीसह संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार्‍या बैठकीत शांतता प्रस्तावावर पाठिंबा मागितला आहे. युक्रेनमध्ये शांततेची डोवाल मुत्सद्देगिरी समोर आली आहे. युक्रेनने भारताकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख आंद्रे येरमाक यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन करून युक्रेनच्या शांतता प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. म्हणजेच रशियासोबतच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी भारत शांततादूताची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनला वाटते. अजित डोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात झेलेन्स्की कार्यालयाच्या प्रमुखांनी युद्धाच्या ताज्या परिस्थितीसह संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार्‍या बैठकीत शांतता प्रस्तावावर पाठिंबा मागितला आहे. रशियाचे युद्ध संपवण्यासाठी युक्रेनने भारताची मदत मागितली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख आंद्रे येरमाक यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन करून संयुक्त राष्ट्रात रशियाविरुद्धच्या मसुद्याच्या ठरावावर भारताच्या पाठिंब्याचे आवाहन केले. ते चिरस्थायी शांततेचा मार्ग शोधण्याशी संबंधित आहे. रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघातील बहुतेक ठरावांवर मतदानाला भारत अनुपस्थित होता.

युक्रेनने शांततेसाठी 10 मुद्यांचा शांतता फॉर्म्युला तयार केला आहे. युद्ध रोखण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याचा उल्लेखही त्या फॉर्म्युल्यात आहे. हा शांतता फॉर्म्युला यूएन चार्टरनुसार तयार करण्यात आला असून हे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडतेच्या प्रस्तावावर आधारित आहे. या प्रस्तावावर 23 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्रात बैठक झालीय. यासाठी युक्रेनने भारताकडे पाठिंबा मागितलाय. रशिया-युक्रेन युद्धात भारताने सुरुवातीपासूनच तटस्थ भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्याची जगभरात चर्चा झाली. त्यामुळे युक्रेन भारताकडे आशेने पाहत आहे. दुसरीकडे पाश्चात्य देशांच्या चिथावणीमुळे हे युद्ध झाले असून युक्रेनमध्ये लष्करी कारवाया सुरू ठेवणार असल्याचेही पुतिन यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. दरम्यान, युक्रेन युद्धाची किंमत चुकवत आहे. विशेषत: गरीब आणि विकसनशील देशांना अन्न संकट, खतांचा तुटवडा आणि पेट्रोल-डिझेलची महागाई यांचा सामना करावा लागतो. या कारणामुळे अनेक देश प्रचंड आर्थिक संकटात अडकले आहेत. हे संकट संपवण्यासाठी शांतता नांदायला हवी. त्यामुळे आता युक्रेनसह जगभरातील देश भारताकडे आशेने पाहत आहेत.