घरसंपादकीयओपेडसोशल मीडियावरचे चोर, जीवाला लावतात घोर!

सोशल मीडियावरचे चोर, जीवाला लावतात घोर!

Subscribe

सोशल मीडिया हा आता उत्पन्नाचा स्रोतही बनला आहे. तुमचे फॉलोअर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची असलेली अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात घेता, त्यातून उत्पन्न मिळवता येते. काही कंपन्यांकडून आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा अकाऊंट्सचा किंवा सेलिब्रिटींचा वापर केला जातो. पण अलिकडे दुसर्‍या मार्गानेदेखील पैसा कमावला जात आहे, अर्थातच लुटमार करून! आता एखाद्याचे डमी अकाऊंटही अ‍ॅक्टिव्ह होऊ लागली आहेत. या अकाऊंटच्या माध्यमातून मूळ व्यक्तीच्या आप्त-मित्रांकडे पैशांची मागणी केली जाते. सुरुवातीला त्यात अनेकांची फसगत झाली. पण आता ‘हे अकाऊंट माझे नाही’ अशा पोस्ट शेअर करून सर्वांना वेळीच सावध केले जाते. अशा परिस्थितीत आता एक नवीन धोका समोर आला आहे, ‘सेक्सटॉर्शन’चा! हा धोका जीवघेणा ठरत आहे.

सोशल मीडिया हा आता उत्पन्नाचा स्रोतही बनला आहे. तुमचे फॉलोअर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची असलेली अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात घेता, त्यातून उत्पन्न मिळवता येते. काही कंपन्यांकडून आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा अकाऊंट्सचा किंवा सेलिब्रिटींचा वापर केला जातो. पण अलिकडे दुसर्‍या मार्गानेदेखील पैसा कमावला जात आहे, अर्थातच लुटमार करून! आता एखाद्याचे डमी अकाऊंटही अ‍ॅक्टिव्ह होऊ लागली आहेत. या अकाऊंटच्या माध्यमातून मूळ व्यक्तीच्या आप्त-मित्रांकडे पैशांची मागणी केली जाते. सुरुवातीला त्यात अनेकांची फसगत झाली. पण आता ‘हे अकाऊंट माझे नाही’ अशा पोस्ट शेअर करून सर्वांना वेळीच सावध केले जाते. अशा परिस्थितीत आता एक नवीन धोका समोर आला आहे, ‘सेक्सटॉर्शन’चा! हा धोका जीवघेणा ठरत आहे.

‘Connecting the people’ असे घोषवाक्य घेऊन आलेल्या नोकिया या मोबाइल ब्रॅण्डने वास्तवात लोकांना सहजरित्या जोडले होते. आता हातातील हा फोन स्मार्ट झाल्याने केवळ आप्त-मित्रच नव्हे तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी लोकांशीदेखील प्रत्येक जण जोडला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील, विविध विचारांची माणसे जोडली गेली. त्यात जगातील घडामोडींचे पडसाद त्यात लगेचच उमटत असल्याने ‘अपडेट’ राहण्यास मदत होते. तर, सोशल मीडियावरील विविध ग्रुपमुळे काही नवनवीन विषय समजतात. काही घटनांबाबतचा एक वेगळा दृष्टिकोन समजतो. पर्यटनाच्या दृष्टीने काही नवीन ठिकाणी समजतात. साहित्य, संगीत तसेच इतर कला जोपासता येतात.
सोशल मीडिया म्हणजे व्यक्त होण्याचे सशक्त साधन ठरले आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाला चुकीची का होईना पण ठाम मते असली पाहिजेत. त्याचाच प्रत्यय सोशल मीडियावर पाहायला मिळतो. सोशल मीडियाचे सर्वाधिक वैशिष्ठ्य म्हणजे, या माध्यमामुळे अनेकांच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, सोशल मीडियावर व्हायरल होणारे मिम्स. याशिवाय, आपली प्रतिभा दाखविण्यात सरकारी विभागही मागे नाहीत. 2019 मध्ये भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम चांद्रयान-2 ही अगदी शेवटच्या टप्प्यात ऐनवेळी सिग्नल तुटल्याने अर्धवट राहिली. त्यावर नागपूर पोलिसांनी केलेल्या ट्वीटची दखल देशभरात घेतली गेली. ‘विक्रम तू सिग्नल तोडलास म्हणून तुझ्याकडून चलान घेणार नाही, पण तू परत ये’, असे हटके ट्वीट नागपूर पोलिसांनी त्यावेळी केले होते. त्यातही उद्योगपती आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका यासारख्या मान्यवरांचे ट्वीटही चर्चेचे विषय ठरतात.

- Advertisement -

सध्या या सोशल मीडियावर अनेक गट आणि तट पाहायला मिळतात. ही या माध्यमाची दुसरी बाजू आहे. जाती-धर्मांचे, पक्षा-पक्षांचे, काही प्रासंगिक असे गट-तट असतात. महाराष्ट्राचा विचार करता गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. अशावेळी हे गट-तट वाढतच चालले आहे. काही वेळेस यातून निर्माण होणारे वाद सभ्यतेची पातळी ओलांडतात. पण चर्चा अविरत सुरूच राहते. काही माणसे नव्याने जोडली जातात, काही अनफ्रेंड होतात, काही एकमेकांना ब्लॉक करतात… चरैवेति चरैवेति. वाद आणि संवाद हा झालाच पाहिजे. त्यातूनच काही ना काहीतरी हाती लागतेच. नुसतेच ‘लाइक्स’ मिळवण्यात काही चार्म नसतो, पोस्टवरच्या कमेंट फार महत्त्वाच्या असतात. आपल्या पोस्टची घेतलेली ती दखल असते. लाइक्स करताना आपली पोस्ट वाचलेलीच असेल याची अजिबात खात्री नसते. अगदीच काही नाही तर, तेढ वाढू न देता केवळ पोस्ट वाचून सोडून देणे, महत्वाचे असते आणि हेच पथ्य काळजीपूर्वक पाळावे लागते.

काही वेळेस अनावश्यक प्रश्न विचारणारे देखील हैराण करतात. फेसबुकला ऑनलाइन असल्यावरही अनेक जण ‘सध्या काय करताय’, ‘जेवण झालं का?’, ‘टीव्ही बघतोय’ असे सांगितल्यावर ‘काय बघताय?’ असे अनेक निरर्थक प्रश्न विचारतात. मुळात त्यांची ओळख केवळ सोशल मीडियावर झालेली असते. तेवढ्यापुरतीच ती राहावी, अशी अपेक्षा असताना अकारण जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातो, हे न उलगडणारे कोडे आहे. सोशल मीडियाने जरी जगभरातील लोकांना एकत्र आणले असले तरी, एका छताखाली राहणार्‍यांचा संवाद मात्र याच सोशल मीडियामुळे खुंटला आहे, हे तर सर्वश्रुत आहे. पण वारंवार सोशल मीडियावर सक्रिय असलेल्यांबाबत फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. याबाबत वेळीच सावधगिरी बाळगणे, ही काळाची गरज आहे. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलेले अकाऊंट फेक आहे का, याची पडताळणी करण्याचा कोणताही पर्याय सोशल मीडियावर नाही. फेसबुकसारख्या माध्यमात तर, प्रोफाईलदेखील ल़ॉक असते आणि फोटोही नसतो, त्यामुळे अशा रिक्वेस्ट स्वीकारायच्या का, हा प्रश्न निर्माण होतो. त्यातही चांगुलपणा दाखवत अशी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर काही वेळेस आपण फार मोठी चूक केल्याचे लक्षात येते. कारण ते अकाऊंट ‘निसर्गाची अवकृपा’ झालेल्याचे असते आणि ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याला येतात. आपणही अनाहूतपणे त्या स्वीकारत जातो. मेसेंजरवर ‘काय चाललाय?’, ‘बोला…’ असे चॅटिंग सुरू झाल्यावर त्याचा थोडा अंदाज येतो आणि बहुतांश वेळी ती भीती वास्तवात उतरते. काही महाभाग असे असतात की, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबरोबर थेट व्हिडीओ कॉलच करतात. कारण विचारले की, ‘सहजच’ किंवा ‘तुम्हाला बघायचे होते’ अशी उत्तरे मिळतात. मग आपली ती फक्त चूकच नव्हती तर, घोडचूक होती, हे समजते. अशा लोकांचे काय करायचे, हा देखील प्रश्नच आहे.

- Advertisement -

फेक अकाऊंटमुळे फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही तरुणी अशा अकाऊंटला भुलून चुकीचे पाऊल उचलतात आणि पस्तावतात. त्यांची स्वप्ने धुळीस मिळतात. त्यांना जो मानसिक धक्का बसतो, त्यातून त्यांना सावरणे ही पालकांसाठी परीक्षाच ठरते. काही मुलांचेही असे झाले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे, हामिद निहाल अन्सारी या मुंबईतील तरुणाचे आहे. फेसबुकवर एका मुलीवर त्याचे प्रेमबंध जुळले आणि याच प्रेमामुळे 2012 मध्ये तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानात गेला आणि त्याला तिथे अटक करण्यात आली. तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे सहा वर्षांनी तो मायदेशी परतला.

सोशल मीडिया हा आता उत्पन्नाचा स्रोतही बनला आहे. तुमचे फॉलोअर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची असलेली अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात घेता, त्यातून उत्पन्न मिळवता येते. काही कंपन्यांकडून आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा अकाऊंट्सचा किंवा सेलिब्रिटींचा वापर केला जातो. पण अलिकडे दुसर्‍या मार्गानेदेखील पैसा कमावला जात आहे, अर्थातच लुटमार करून! आता एखाद्याचे डमी अकाऊंटही अ‍ॅक्टिव्ह होऊ लागली आहेत. या अकाऊंटच्या माध्यमातून मूळ व्यक्तीच्या आप्त-मित्रांकडे पैशांची मागणी केली जाते. सुरुवातीला त्यात अनेकांची फसगत झाली. पण आता ‘हे अकाऊंट माझे नाही’ अशा पोस्ट शेअर करून सर्वांना वेळीच सावध केले जाते. अशा परिस्थितीत आता एक नवीन धोका समोर आला आहे, ‘सेक्सटॉर्शन’चा! हा धोका जीवघेणा ठरत आहे. महाराष्ट्राचा विचार करता सध्या पुणे हे त्याचे केंद्र बनले आहे. पुण्यातील दत्तवाडी येथील एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला ऑनलाइन माध्यमातून ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले आणि त्याचे आक्षेपार्ह छायाचित्र सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या ब्लॅकमेलरना त्याने साडेचार हजार रुपये दिले, मात्र याचा ताण त्याला असह्य झाला आणि त्याने 28 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक आयडीवरून त्याचे चॅटिंग व्हायचे. त्यात त्याला अर्धनग्न फोटो पाठवायला सांगितले होते. त्याने तसे केले आणि त्यात तो फसला. धनकवडी भागातील एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही सायबर गुन्हेगारांच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली. पुण्यात जानेवारीपासून अशी 1 हजार 445 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे, ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात केवळ तरुणच नव्हे तर, वयस्कर व्यक्तीही अडकल्या आहेत. हे वाढते प्रमाण लक्षात घेता पुण्यातील सर्व 32 ठाण्यांमध्ये सायबर गुन्हे विभाग सुरू केले आहेत.

विशेष म्हणजे, दुसर्‍या प्रकरणात त्या तरुणाला व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात महिलेशी ओळख झाली आणि त्याने न्यूड व्हिडीओ बनवला होता. व्हॉट्सअ‍ॅप व इतर तत्सम कंपन्यांच्या ‘व्हॉइस कॉल’वर लक्ष ठेवणे सरकारसाठी जिकरीचे आहे. या ओव्हर द टॉप (ओटीटी) कंपन्यांच्या फोन कॉल्सचा मागोवा घेणे सरकारी संस्थांना कठीण जात आहे. देशात सध्या जवळपास 50 कोटींहून अधिक लोक स्मार्टफोनचा वापर करतात. त्यापैकी जवळपास 70 टक्के लोक ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यामुळे या व्हॉइस कॉलवर सरकारचे नियंत्रण नसणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असून आर्थिक फसवणुकीचे कारणही ठरत आहे. अशा परिस्थितीत सरकारला कोणत्याही परिस्थितीत ते नियामकाच्या कक्षेत आणायचे आहे. ते एकदा आले की, व्हॉट्सअ‍ॅपचा तसेच इतर प्लॅटफॉर्मचा प्रश्न सुटू शकेल. येथे प्रश्न असा निर्माण होतो की, अशा सायबर गुन्हेगारांपर्यंत फोननंबर कसे पोहोचतात? भारतात अशा फोन नंबरची विक्री करण्याचा मोठा उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात येते. हे सत्य आहे, हे म्हणण्याला वाव आहे. कारण या अशाच फोननंबर देण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध जाहिरातींचे मेसेज येत राहतात. मग ते नव्या इमारतीतील फ्लॅटपासून रमी या खेळापर्यंत कुठलेही असतात.

पूर्वी कुरिअर आल्यावर कोणत्याही नंबरची नोंद होत नसे. पण आता पार्सल घेताना कुरिअर कंपनीला मोबाइल नंबर द्यावा लागतो. कशासाठी? काही दुकानदार ‘पेपरलेस’ व्यवहाराचे कारण देत मोबाइल नंबर मागतात. त्या नंबरवर बिल पाठवले जाते. यात मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या दुकानांचाही समावेश आहे. तर काही प्रसिद्ध सुपरमार्केट्सही बिल बनविताना ग्राहकांकडून फोन नंबरची मागणी करतात. तथापि, या सर्वांना नकार देण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला आहे, हेच अनेकांना माहीत नसते. कारण ही त्या व्यक्तीची खासगी माहिती आहे. त्यामुळे आपला मोबाइल नंबर द्यायचा की नाही, हे संबंधित व्यक्ती ठरवू शकते. पण याची फारशी कोणाला कल्पना नसल्याने त्याचा फायदा या सर्व कंपन्या, विक्रेते घेतात. मुळात ही जबाबदारी सर्वसामान्यांवर टाकण्याची गरजच नाही. दूरसंचार सेवा पुरविणार्‍या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ट्राय’ हे संस्था असताना असे प्रकार घडत आहेत, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कारण नुसता व्याधीवर उपचार करून उपयोग नाही. ती व्याधी समूळ नष्ट होणे गरजेचे आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -