श्रीपाद रघुनाथ जोशी हे कथाकार, अनुवादक आणि कोशकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी विपुल लेखन केलं असून जवळपास दोनशे पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२० रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात झाला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी ब्रिटिशविरोधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना 1942-1944 मध्ये येरवडा तुरुंगात ठेवले होते. जोशी यांनी मुख्यत: मराठी किंवा हिंदीमध्ये १९४ पुस्तके लिहिली ज्यात महात्मा गांधींच्या जीवनातील विविध पैलूंवरील एक, सात खंडांचे प्रवासवर्णन आणि मुस्लीम संस्कृतीवरील पुस्तक यांचा समावेश आहे. त्यांनी काही उर्दू कविता मराठीत अनुवादित केल्या.
मराठी हिंदुस्तानी कोश, विद्यार्थी हिंदी-मराठी कोश, अभिनव शब्दकोश, उर्दू-मराठी शब्दकोश, उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश असे त्यांचे काही शब्दकोश गाजले होते. अखेरचं पर्व, अनंता काय रे केलंस हे?, अबलांचे आसू, आनंदी गोपाळ, कस्तुरीचे कण, ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन, गांधीजी : एक झलक, गांधी जीवन प्रसंग, ग्यानबाचा गांधीबाबा, ग्रामीण विकासाची वाटचाल, चिनारच्या छायेत, चीनचे आक्रमण व गांधीवाद, जिब्रानच्या नीतिकथा, तुरुंगातले दिवस, देवाशपथ खरं सांगेन, पाथेय, महाराष्ट्राचे समाज सुधारक, मी पाहिलेले गांधीजी, मी भूमिपुत्र, मुस्लीम सण आणि संस्कार, रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र-अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. जोशी यांना महाराष्ट्र राज्य सरकारने 1980 मध्ये संतवन पुरस्काराने सन्मानित केले. श्रीलाल शुक्ललिखित ‘राग दरबारी’ या हिंदी कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (1990) मिळाला होता. श्रीपाद जोशी यांचे २४ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.