जेथींचिया कृपा लाहिजे वरु। तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥
अर्जुन म्हणतो:- ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी, त्यांच्याशीच...
देखैं मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥
असे पहा की, मातापितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे...
नातरी महासिद्धिसंभ्रमें। जिंतला तापसु भ्रमें। मग आकळूनि कामें । दीनु कीजे //
आपल्याला अणिमादि महासिद्धी मिळाव्या या मोहाने परवश झालेला तपस्वी भ्रम पावतो व त्या...