निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखै मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥
अर्जुना, स्थिरपणाची भावना त्याच्या अंतःकरणात मुळीच उत्पन्न होत नसेल,...
म्हणौनि आइकें अर्जुना। जैसा विस्फुलिंग लागे इंधना। मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना। पुरों शके||
म्हणून अर्जुना, ऐक इंधनाला ठिणगी लागून ती भडकली म्हणजे जशी त्रिभुवनालादेखील...
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥
ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली, तेच पार पडतात; आणि पाप व पुण्य...