घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना? । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी? ॥
तर अर्जुना, तूच सांग बरे, की या विश्वाची जी अनादी रचना, ती खोटी असून या त्रैलोक्याचा पालनकर्ता तूच आहेस की काय?
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वायांचि काय बोलती। जगामाजीं? ॥
या सृष्टीत कोणी एक ऐश्वर्यसंपन्न ईश्वर असून त्याच्यापासून प्राणिमात्रांची उत्पत्ती होते असे जे जगामध्ये म्हणतात, ते सर्व खोटेच की काय?
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिले । तुझेनि कायी ॥
तर मग आता असे झाले म्हणावयाचे की, जन्ममृत्यू तूच उत्पन्न केलेस; तेव्हा तूच जर त्यांचा नाश केलास तरच ते नाश पावतील की काय?
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥
जरी भ्रममूलक अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा नाश करण्याचे तू मनात आणले नाहीस, तरी हे चिरंजीव होतील का सांग बरे?
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसीं ॥
किंवा तूच काय तो एक मारणारा आणि बाकीचे हे सर्व मरणारे, असा भ्रम कदाचित तुझ्या चित्ताला होईल, पण ती होऊ देऊ नको!
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥
अरे हे सर्व अनादिसिद्ध आहे. ते स्वभावत:च उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे. त्याबद्दल तू उगाच शोक का करतोस, मला सांग पाहू?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -