घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ना तरी शब्दब्रह्मान्धि मथियला व्यासबुद्धि / निवडिले निरवधि / नवनीत हें //
अथवा व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूप अनुपमेय नवनीत काढले.
मग ज्ञानाग्निसंपर्के / कडसिलें विवेकें / पद आलें परिपाके / आमोदासी //
त्यास ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळ लावून ते पुरे कढविल्यावर त्याचे सुवासिक तूप बनले.
जें अपेदिजे वरकतीं / सदा अनुभविजे संती सोहंभावे पारंगतीं / रमिजे जेथ //
त्याची वैराग्यवंत इच्छा करतात, संत नेहमी सेवन करतात व ब्रह्मनिष्ठदेखील त्याच्या ठिकाणी रममाण होतात.
जें आकर्णिजे भक्तीं / जें आदिवंद्य त्रिजगती /तें भीष्मपर्वीं संगती / सांगिजैल //
जे भक्तांनी ऐकण्याला योग्य व सर्व जगात परमपुज्य आहे, ते भीष्मपर्वामध्ये सांगितले आहे,
जें भगवद्गिता म्हणिजे / जें ब्रह्मेशांनी प्रशंसिजे / जें सनकादिकीं सेविजे / आदरेसीं //
त्याला भगवद्गीता असे म्हणतात; ब्रह्मा व शंकर हे तिची स्तुती करतात व सनकादिक अति आदराने तिचे सेवन करतात.
जैसे शारदियेचे चंद्रकळे / माजीं अमृतकण कोंवळे / ते वेंचिती मनें मवाळें / चकोरतलगें
ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे अमृत कण चकोर पक्ष्याची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करतात.
तियांपरी श्रोतां / अनुभवी हे कथा / अति हळुवारपम चित्ता / आणुनियां //
त्याप्रमाणे श्रोत्यांनी हळुवारपणे चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा.
हें शब्देंवीण संवादिजे / इंद्रिया नेणतां भोगिजे / बोलाआदि झोंबिजे / प्रमेयासी //
या गीतेतील कथेचा बोलल्याशिवाय विचार करावा, इंद्रियांना न कळता अनुभव घ्यावा आणि ती ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे.
जैसे भ्रमर परागु नेती / परी कमळदळें नेणती / तैसी परी आहे सेविती / ग्रंथी इये //
ज्याप्रमाणे भ्रमर (भुंगा) कमळदलाला समजू न देता त्यांतील पुष्परेणु सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -