घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसे ं जे अगाध / जेथ वेडावकी वेद / तेथ अल्प मी मतिमंद / काई होये //
असे हे गीताशास्त्र गहन असून याच्या ठिकाणी वेदांचीदेखील मती गुंग होऊन गेली, तेव्हा अशा ठिकाणी माझ्यासारख्या अल्प व मतिमंदाची काय कथा?
हें अपार कैसेनि कवळावें | महातेज कवणें धवळावें | गगन मुठीं सुवावें | मशकें केवीं //
हें अपार गीतातत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे ? सूर्याच्या तेजाला कोणी उजाळा द्यावा? व चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे?
परी एथ असे एकु आधारु | तेणेंचि बोलें मी सधरु | जैं सानुकूळ श्रीगुरु | ज्ञानदेवो म्हणे //
परंतु ज्ञानदेव म्हणतात, ज्या अर्थीं श्रीगुरु मला अनुकूल आहेत, त्या अर्थी एवढे महत्कृत्य करण्याला त्यांचाच एक आधार आहे व याचमुळे मला धीर आला आहे. येर्‍हवीं तरी मी मूर्खु | जरी जाहला अविवेकु | तरी संतकृपादीपकु | सोज्वळु असे //
एरवी मी खरोखर मूर्ख असून अविचाराचीच गोष्ट करीत आहे; तथापि तुम्हा संतांचा कृपादीप लकलकीत आहे हे मी माझे भाग्य समजतो.
लोहाचें कनक होये | हें सामर्थ्य परिसींच आहे | कीं मृतही जीवित लाहे | अमृतसिद्धि //
परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचें सोने होते किंवा मेलेल्या मनुष्यास अमृत पांजिले असता तो जिवंत होतो,
जरी प्रकटे सिद्धसरस्वती | तरी मुकयाहि आथी भारती | एथ वस्तुसामर्थ्यशक्ती | नवल कायी //
अथवा सरस्वतीच प्रसन्न झाली तर मुक्याला देखील वाचा फुटते, तेव्हा यात नवल नसून हे केवळ वस्तुमाहात्म्य आहे.
जयातें कामधेनु माये | तयासी अप्राप्य कांहीं आहे | म्हणौनि मी प्रवर्तों लाहें | ग्रंथीं इये //
कामधेनुच ज्याची आई, त्याला दुर्लभ असे काय आहे? म्हणून मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -