Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पतिव्रतेचें हृदय जैसें | पतिवांचूनि न स्पर्शे | मी सर्वस्व या तैसें | सुभटांसी //
ज्याप्रमाणें पतिव्रतेचे मन पतीवाचून दुसरे ठिकाणी जात नाही; केवळ पतीच्याच ठिकाणी असते, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण आहे.
आमुचिया काजचेनि पाडें | देखती आपुलें जीवित थोकडें | ऐसें निरवधि चोखडें | स्वामिभक्त //
आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात, इतके ते पराकोटीचे स्वामिभक्त आहेत.
झुंजती कुळकणी जाणती | कळे कीर्तीसी जिती | हें बहु असो क्षात्रनीती | एथोनियां //
हे युद्धकलेमध्ये निष्णात असून चातुर्याने कीर्ति संपादन करितात. फार काय सांगावे क्षत्रियांचा धर्म यांच्यापासूनच प्रसिद्धीस आला!
ऐसें सर्वांपरि पुरते | वीर दळीं आमुते | आतां काय गणूं यांतें | अपार हे //
याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अनेक वीर आहेत; त्यांची किती म्हणून गणती करावी !
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु | जो जगजेठी जगीं सुभटु | तया दळवैपणाचा पाटु | भीष्मसी पैं //
तशात, सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगांतील सर्व योद्ध्यांमध्ये प्रतापी असे जे भीष्माचार्य, त्यांच्याकडे या सर्व सैन्याचे आधिपत्य दिलेले आहे.
आतां याचेनि बळें गवसलें | हे दुर्ग जैसे पन्नासिलें | येणें पाडें थेकुलें | लोकत्रय //
त्यांनी हे सर्व सैन्य आवरून अशा बेताने रचिले आहे की, जणुकाय हे किल्लेच बांधिले आहेत. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवनदेखील तुच्छ आहे.
आधींच समुद्र पाहीं | तेथ दुवाडपण कवणा नाहीं | मग वडवानळु तैसेयाही | विरजा जैसा //
विचार केला असता ज्याप्रमाणे सर्व प्रकारे समुद्र दुस्तर असून आणखी त्यास वडवानलाचे साहाय्य व्हावे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -