घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसा भ्रमर भेदी कोडें |भलतैसें काष्ट कोरडें | परि कळिकेमाजीं सांपडे | कोंवळिये //
भ्रमर कोणत्याही वाळलेल्या कठीण लाकडास सहज भोक पाडतो, परंतु कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर अडकून पडतो.
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें | परि तें कमळदळ चिरूं नेणे | तैसें कठिण कोवळेपणें | स्नेह देखा //
तेथे त्याचा प्राण जरी गेला तरी तो त्या कमळाच्या पाकळ्यांना भोक पाडण्याचे मनातही आणित नाही, त्याप्रमाणेच आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे.
हे आदिपुरुषाची माया | ब्रह्मेयाही नयेचि आया | म्हणौनि भुलविला ऐकें राया | संजयो म्हणे //
संजय म्हणतो:- राजा धृतराष्ट्रा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही; म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले,
अवधारी मग तो अर्जुनु | देखोनि सकळ स्वजनु | विसरला अभिमानु | संग्रामींचा //
राजा, ऐक. मग आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयीचा सर्व अभिमान पार मावळून गेला.
कैसी नेणों सदयता | उपनली तेथें चित्ता | मग म्हणे कृष्णा आतां | नसिजे एथ //
त्या ठिकाणी त्याचे मनात करुणा कशी उद्भवली हे कळत नाही. मग तो श्रीकृष्णास म्हणाला, देवा, मला वाटते, आता येथे राहू नये.
माझें अतिशय मन व्याकुळ | होतसे वाचा बरळ | जे वधावे हे सकळ | येणें नांवें //
या सर्वांस मारावयाचे ही गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अति व्याकुळ होऊन तोंडातून शब्द उमटेनासा झाला आहे.
या कौरवां जरी वधावें। तरी युधिष्ठिरादिकां कां न वधावें। हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे //
या कौरवांना जर मारावयाचे, तर मग धर्मराजादिकांना का मारू नये? कारण, हे दोनही माझे गोत्रजच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -