घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

देखैं मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥
असे पहा की, मातापितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे सुखी ठेवावे असा धर्म आहे. असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा?
देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा?॥
देवा साधुसंतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी, पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी?
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥
त्याचप्रमाणे हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सर्वदा पूज्य आहेत. त्यातल्या त्यात भीष्म व द्रोण यांविषयी तर माझे मन अतिशयच कळवळत आहे.
जयांलागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शकों धरू । तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा?॥
देवा, ज्याच्याविषयी आम्ही स्वप्नातदेखील वैर धरू शकत नाही, त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करावा बरे?
वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहलें । जे यांच्या वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥
त्यापेक्षा आमचे हे जगणे व्यर्थ आहे. आम्ही आजपर्यंत जी विद्या मिळवली आहे, तिचा उपयोग या सर्वांना मारण्याकडे करून आम्ही प्रतिष्ठा मिरवावी, हेच का आमचे कर्तव्य!
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें?॥
मी – अर्जुन द्रोणाचार्याचा शिष्य; त्यांनीच मला धनुर्विद्या शिकविली; त्या उपकाराने आभारी झालेला मी त्यांना मारावे काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -