Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जेथींचिया कृपा लाहिजे वरु। तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥
अर्जुन म्हणतो:- ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी, त्यांच्याशीच कृतघ्नपणा करावा! तर मग काय मी भस्मासूर आहे?
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे। परी क्षोभु मनीं नेणिजे द्रोणाचिये ॥
देवा, समुद्र गंभीर आहे, असे ऐकतो; पण त्याच्या उलट तोसुद्धा क्षुब्ध झालेला प्रत्यक्ष दिसतो; परंतु द्रोणाचार्यांच्या मनात क्षोभ उत्पन्न झालेला आम्हाला स्वप्नातदेखील ठाऊक नाही.
हें अपार जें गगन । वरि तयाही होईल मान । परी अगाध भलें गहन । हृदय याचें ॥
आभाळाला अंत नाही, पण त्याचेही माप करता येईल; परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण इतके खोल आहे की, त्याचे प्रमाण कोणालाही कळत नाही.
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥
कदाचित अमृतही आंबेल किंवा कालगतीने वज्रही फुटेल, पण द्रोणाचार्यांस क्रोध आणण्याचा प्रयत्न केला तरीदेखील तो येत नाही.
स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥
स्नेहाविषयी नेहमी आईचे उदाहरण देतात व ते खरेही आहे. पण या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत दया वसत आहे.
हा कारुण्याची आदि। सकल गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥
अर्जुन म्हणतो:- हे आचार्य म्हणजे दयेचा उगम, सर्व गुणांची खाण व विद्येचे अमर्याद सागरच आहेत.
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु। आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥
अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ असून आम्हाविषयी तर पूर्ण कृपावंत आहेत, तेव्हा यांचा घात करण्याचे मनात येईल तरी का?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -