घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधी ॥
त्या वेळी अर्जुन म्हणाला, ‘श्रीकृष्णा, कृपानिधी, याचबद्दलचा खुलासा मी जो विचारीन, तो कृपा करून मला सांगा.’
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥
मग श्रीकृष्ण म्हणतात, ‘अर्जुना, जे तुला संतोषित मनाने योग्य वाटेल, ते खुशाल विचार.’
या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥
असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला,‘स्थितप्रज्ञ (ज्यांची बुद्धि स्थिर आहे तो) कोणाला म्हणावे व तो ओळखावा कसा, हे उघड करून सांगा.
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥
ज्याला स्थिरबुद्धि म्हणतात व जो निरंतर समाधिसुख भोगतो, तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा?
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपीं विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥
देवा, लक्ष्मीपती, तो कोणत्या स्थितीत असतो व कोणत्या रूपाने वर्तन करतो, हे कृपा करून मला सांगा.’
तव परब्रह्म अवतरणु । जो षड्गुणाधिकारणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥
तेव्हा षड्गुणैश्वर्यसंपन्न, सर्व गुणाचे अधिष्ठान व परब्रह्मावतार असे भगवान श्रीकृष्ण बोलू लागले.
म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसीं । करीतु असे ॥
श्रीभगवान म्हणतात- अर्जुना, ऐक. मनातील तृष्णा, आत्मसुखाला विघ्न करीत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -