घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि आइकें अर्जुना। जैसा विस्फुलिंग लागे इंधना। मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना। पुरों शके||
म्हणून अर्जुना, ऐक इंधनाला ठिणगी लागून ती भडकली म्हणजे जशी त्रिभुवनालादेखील पुरते,

तैसें विषयांचें ध्यान। जरी विपायें वाहे मन| तरी येसणें हें पतन| गिंवसित पावे||
त्याप्रमाणे अंतःकरणात यत्किंचित् जरी विषयाचे स्मरण झाले, तरी मोठा अनर्थ ओढवतो!

- Advertisement -

म्हणौनि विषय हे आघवे| सर्वथा मनौनि सांडावे| मग रागद्वेष स्वभावें। नाशतील||
म्हणून मनातून सर्व विषय काढून टाकावे, म्हणजे राग, प्रीति आणि द्वेष (अप्रीति) हे आपोआप नाहीसे होतात.

पार्था आणिकही एक। जरी नाशले रागद्वेष| तरी इंद्रिया विषयीं बाधक| रमतां नाहीं||
पार्था, आणखी तुला सांगतो की, राग व द्वेष नाहीसे झाल्यावर जरी इंद्रिये विषयाचे ठिकाणी रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत.

- Advertisement -

जैसा सूर्य आकाशगतु। रश्मिकरें जगातें स्पर्शतु| तरी संगदोषें काय लिंपतु| तेथिचेनि||
ज्याप्रमाणे आकाशातून सूर्य हा आपल्या किरणरूपी हातानी जगातील वस्तूंना स्पर्श करितो, परंतु त्यांच्या संसर्गदोषानें लिप्त होत नाही?

तैसा इंद्रियार्थीं उदासीन। आत्मरसेंचि निर्भिन्न। जो कामक्रोधविहीन| होऊनि असे||
त्याप्रमाणे जो विषयाचे ठिकाणी उदासीन, आत्मस्वरूपाचे ठिकाणी निमग्न व कामक्रोधापासून अलिप्त असतो,
तरी विषयां तयां कांहीं। आपणपेंवाचूनि नाहीं। मग विषय कवण कायी। बाधितील कवणा||
आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपावाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय? आणि कसली कोणाला बाधा करणार?

जरी उदकीं उदक बुडिजे| कां अग्नि आगी पोळिजे। तरी विषयसंगें आप्लविजे। परिपूर्णु तो||
जर पाण्यात पाणी बुडेल किंवा अग्नीने अग्नी जळेल, तर मात्र तो परिपूर्ण पुरुष विषयाचे संगतीने बुडेल

ऐसा आपणचि केवळु। होऊनि असे निखळु। तयाची प्रज्ञा अचळु| निभ्रांत मानीं||
अशा प्रकारे जो आपण स्वतःच सर्वरूप होऊन राहतो, तो अचलप्रज्ञ (स्थिरबुद्धी) असे निःसंशय समज.

देखैं अखंडित प्रसन्नता। आथी जेथ चित्ता| तेथ रिगणें नाहीं समस्तां। संसारदु:खां||
असे पाहा की ज्याचे मन पूर्ण शांत आहे, त्याच्या मनात ह्या सर्व संसारदु:खाचा प्रवेश होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -